• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपुरात 137 वारकऱ्यांना भगरीतून विषबाधा

Yes News Marathi by Yes News Marathi
February 2, 2023
in इतर घडामोडी
0
पंढरपुरात 137 वारकऱ्यांना भगरीतून विषबाधा
0
SHARES
0
VIEWS

अन्न आणि औषध प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड

  • पंढरपूर – माघी एकादशी सोहळ्यासाठी आलेल्या मराठवाड्यातील 137 भाविकांना भगरीतून विषबाधा झाली आहे. भाविकांना उप[जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून पुन्हा एकदा अन्न आणि औषध प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड पडल्याने याचा फटका वारकऱ्यांना बसला आहे.
  • माघी सोहळ्यासाठी नांदेड, परभणी भागातील हदगाव येथून निघालेली मराठा पायी दिंडी सोहळ्यात 175 भाविक सहभागी झाले होते. हे भाविक 31 जानेवारी रोजी येथील निळोबाराय मठात उतरले होते. काल माघी एकादशीचा सोहळा असल्याने सर्वच वारकऱ्यांचा उपवास होता. त्यामुळे येथील कौस्तुभ ट्रेडिंग कंपनी या दुकानातून या वारकऱ्यांनी भगर आणून शिजवून फराळ केला. यानंतर दिवसभर भजन सुरू झाल्यावर यातील जवळपास 137 वारकऱ्यांना मळमळ, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने रात्री उशिरा या सर्व वारकऱ्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू केले.
  • 137 वारकऱ्यांपैकी 48 वारकऱ्यांना त्रास कमी असल्याने त्यांना औषधे देऊन देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून तातडीने या दुकानातील भगर आणि इतर पदार्थांचे सॅम्पल अन्न आणि औषध प्रशासनाने घेतली असून तपासणीसाठी पाठवून देण्यात आली आहेत. या घटनेनंतर सोलापूरचे सिव्हिल सर्जन डॉ. धनंजय पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन वारकऱ्यांची तपासणी केली. सर्व वारकरी धोक्याच्या बाहेर आले असले तरी देवाच्या दर्शनाला आलेल्या वारकऱ्यांना हलक्या प्रतीचे उपवासाचे पदार्थ दिल्याने त्यांना विषबाधेचा सामोरे जावे लागले .
  • वास्तविक प्रत्येक यात्रेपूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाने शहरात येऊन शहरातील दुकानांमधील सामानाची तपासणी करणे आवश्यक आहे. धोकादायक पद्धतीने अन्न पदार्थांची विक्री सुरू असताना हे अधिकारी कारवाई करताना दिसत नाहीत. यात्रा तयारी बैठकीत प्रत्येकवेळी जिल्हा प्रशासन अन्न आणि औषध प्रशासनाला सूचना देऊनही या विभागाचा गहाळ कारभार वारकऱ्यांच्या जीवावर उठत आहे. घटना घडल्यावर तातडीने नमुने गोळा करण्याचे काम करणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासनाने नियमानुसार, यात्रेपूर्वी ही तपासणी केली असती तर वारकऱ्यांच्या जीवाशी हा खेळ झाला नसता.
  • घटना घडल्यानंतर सहायक आयुक्त सुनील कुचेकर यांनी आपल्या विभागाने 37 दुकानाची यात्रेपूर्वी तपासणी केल्याचे उत्तर दिले. आता या दुकानातून जवळपास 32 हजार रुपयांचे साहित्य अन्न आणि औषध विभागाने जप्त करून तपासणीला पाठवून दिले आहेत. मात्र वारंवार भगर खाल्ल्याने असे प्रकार घडत असताना आता शासनानेच याबाबत गांभीर्याने कारवाई करण्याची मागणी करत आहेत. वारीसोबत आलेल्या वारकऱ्यांना पंढरपूर शहरातील किराणा दुकानाबाबत कोणतीच माहिती नसते. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने यात्रेपूर्वी अशा तपासण्या केल्या तरी विठ्ठल दर्शनाला येणाऱ्या भाविकांना रुग्णालयत दाखल होण्याची वेळ येणार नाही. या प्रकारणात दोषी असणाऱ्या सर्वांवर शासनाने कडक कारवाई करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली आहे.
Previous Post

जागतिक पाणथळ दिनानिमित्त पक्षी निरीक्षण आणि तज्ञांशी संवाद

Next Post

अज्ञात व्यक्तीची अयोध्येतील राम जन्मभूमी बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Related Posts

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती
इतर घडामोडी

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

August 21, 2026
Next Post
अज्ञात व्यक्तीची अयोध्येतील राम जन्मभूमी बॉम्बने उडवून देण्याची धमकी

अज्ञात व्यक्तीची अयोध्येतील राम जन्मभूमी बॉम्बने उडवून देण्याची धमकी

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026