सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभाग, पोलीस प्रशिक्षण केंद्र, केगाव आणि इको फ्रेंडली क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पाणथळ दिनानिमित्त पक्षीनिरीक्षण आणि तज्ज्ञांशी संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी डॉ. श्री. अरविंद कुंभार (पक्षी आणि पाणथळ अभ्यासक) आणि श्री. शिवानंद हिरेमठ (पक्षी अभ्यासक) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हा उपक्रम 3 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी : 6.30 वा. पाणथळ क्षेत्र, पोलीस प्रशिक्षण केंद्र, केगाव-सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून पर्यावरणप्रेमींनी यात आपला सक्रिय सहभाग नोंदवून या अनोख्या निसर्ग मेजवानीचा अनुभव घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.