No Result
View All Result
- उत्तर सोलापूर (तालुका प्रतिनिधी) :- वडाळा येथील श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन बापूराव भाऊराव साठे ( वय ५५ वर्षे ) यांचे रविवारी (दि.29) अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.
- न्यू हायस्कूलमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक ते वरिष्ठ लिपिक असा 32 वर्षांचा नोकरीचा प्रवास करीत असताना संस्थेच्या निर्णय प्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांचे विश्वासू सल्लागार म्हणून त्यांची सर्वदूर ओळख होती. त्यांची निष्ठा पाहून काका साठे यांनी त्यांच्यावर संस्थेचे संस्थेचे उपाध्यक्ष व वडाळा सोसायटीचे चेअरमन ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली. मीतभाषी संयमी आणि हजरजबाबीपणा यामुळे ते लोकप्रिय होते. संस्थेतील कर्मचारी व तालुक्यातील लोकांच्या समस्या सोडविण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या निधनामुळे वडाळा व उत्तर सोलापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
- बापू साठे यांच्या अकाली निधनामुळे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले असून बापू साठे हे संस्थेचा आत्मा होते असे काका साठे यांनी शोक संदेशात म्हंटले आहे. फुलांच्या माळांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये बापूराव साठे यांचा मृतदेह ठेवण्यात आला. न्यू हायस्कूलच्या प्रांगणामध्ये त्यांची अंत्ययात्रा आल्यानंतर संस्थेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून गावकऱ्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर वडाळा येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीमध्ये सायंकाळी चार वाजता त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह भ प प्रकाश बोधले महाराज, वडाळा गावचे सरपंच व संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र साठे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष अविनाश मार्तंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद यांच्यासह आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी, एक भाऊ भावजय, पुतणे असा परिवार आहे.
No Result
View All Result