• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

यंदा सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवास आर्ची येणार; रविवारपासून मंगळवेढ्यात रंगणार युवा महोत्सव!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 7, 2022
in मुख्य बातमी
0
यंदा सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवास आर्ची येणार; रविवारपासून मंगळवेढ्यात रंगणार युवा महोत्सव!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा युवा महोत्सव दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालय, मंगळवेढा येथे होणार असून रविवार, दि. 9 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

रविवारी सकाळी दहा वाजता पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थित उद्घाटन सोहळा होणार आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता एकांकिका रंगमंचाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते होईल. 9 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत नृत्य, नाट्य, ललित, वांग्मय, संगीत विभागातील एकूण 29 कलाप्रकारांचे सादरीकरण या युवा महोत्सवात होणार आहे. सुमारे 75 महाविद्यालये आणि जवळपास दोन हजार विद्यार्थी, कलाकारांचा यामध्ये सहभाग राहणार आहे.

युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत नोंदणी, उद्घाटन सोहळा, संघ व्यवस्थापनकांची बैठक, मूकनाट्य, समूहगीत, कातरकाम, प्रश्नमंजुषा लेखी, मराठी-हिंदीइंग्रजी वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन, भितीचित्रण, रांगोळी आणि एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे. सोमवार, दि. 10 ऑक्टोबर रोजी शास्त्रीय नृत्य, सुगम गायन, पथनाट्य, स्थळचित्रण, वादविवाद, फोक आर्केस्ट्रा, शास्त्रीय सुरवाद्य, कथाकथन, मिमिक्री, स्पॉट फोटोग्राफी, एकांकिका (मराठी, हिंदी) आदी स्पर्धा पार पडतील. मंगळवार दि. 11 ऑक्टोबर रोजी प्रश्नमंजुषा तोंडी, निर्मिती चित्र, शास्त्रीय गायन, व्यंगचित्रण, लघुनाटिका, शास्त्रीय तालवाद्य, मातीकाम आणि लोकनृत्याच्या स्पर्धा रंगतील.

बुधवार, दि. 12 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9 वाजता शोभायात्रा पार पडल्यानंतर सकाळी अकरा वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. सैराट फेम सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक दिली जाणार आहेत. या पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ कळवणे, पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे आदी उपस्थित होते.

वॉटरप्रूफ मंडप, साउंड, निवास, भोजन व्यवस्था चोख
यंदाच्या युवा महोत्सवाचे यजमान दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. सुजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, परीक्षक, मान्यवर यांच्या भोजन, निवास आदी व्यवस्थेचे चोख नियोजन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे मुख्य रंगमंच आणि इतर स्पर्धेसाठी चार ते पाच मोठे रंगमंच संपूर्ण वॉटरप्रूफ मंडप मारून तयार करण्यात आले आहे. कलाप्रकार सादरीकरणासाठी उत्तम साऊंड व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी कलाकारांना कोणतीच अडचण भासणार नसल्याचा विश्वास विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ कळवणे यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

शिंदे गटाची कागदपत्रं मिळालीच नाहीत, ठाकरे गटाचं आयोगाला पहिलं लेखी निवेदन

Next Post

शिव मल्हार प्रतिष्ठानच्यावतीने पायी जाणाऱ्या भाविकांना फळे वाटप

Related Posts

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…
मुख्य बातमी

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
मुख्य बातमी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

September 24, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
Next Post
शिव मल्हार प्रतिष्ठानच्यावतीने पायी जाणाऱ्या भाविकांना फळे वाटप

शिव मल्हार प्रतिष्ठानच्यावतीने पायी जाणाऱ्या भाविकांना फळे वाटप

ताज्या बातम्या

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026