• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कायद्याच्या चौकटीत काम करा; तक्रारी कमी येतील – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

Yes News Marathi by Yes News Marathi
September 28, 2022
in मुख्य बातमी
0
कायद्याच्या चौकटीत काम करा; तक्रारी कमी येतील – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : शासकीय कार्यपद्धतीबद्दल सामान्य जनतेला साशंकता वाटू नये व त्यांची कामे विनाविलंब, सहजगत्या, पारदर्शी व्हावीत यासाठी ‘माहितीचा अधिकार’ या कायद्याची निर्मिती झाली. प्रत्येक शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियमानुसार कायद्याच्या चौकटीत राहून काम केल्यास माहिती अधिकाराबाबतचे अर्ज आणि तक्रारी कमी प्रमाणात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकारी दिनानिमित्त आयोजित माहिती अधिकार कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात शंभरकर बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रमुख मार्गदर्शक जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंह रजपूत, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, सोपान टोंपे, तहसीलदार अंजली कुलकर्णी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, जनमाहिती अधिकारी, सहायक जनमाहिती अधिकारी उपस्थित होते.

शंभरकर यांनी सांगितले की, शासनाच्या कामात पारदर्शकता यावी, शासनाच्या कारभाराची माहिती सामान्य जनतेला व्हावी. प्रशासकीय कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहारास वाव राहू नये, चुकीचे काम होऊ नये, यासाठी माहिती अधिकार कायदा लागू झाला. अनेकजण वारंवार तक्रारी करतात किंवा माहिती अधिकारात माहिती मागवितात. एखाद्या व्यक्तीवर खरोखर अन्याय झाला असेल तर प्रशासनाने याकडे सकारात्मक पाहून न्याय द्यावा. प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शंका निर्माण होईल, असे काम करू नये, कायद्यानुसार जी माहिती असेल ती नाकारू नये. यामुळे नागरिकांचा आणखी संशय बळावतो, यामुळे काम करताना पारदर्शी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

माहिती अधिकार कायद्याचा दुरूपयोग केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो- प्रदीपसिंह रजपूत

माहिती अधिकार कायद्याचा दुरूपयोग केल्याचे उघड झाल्यास, एकच व्यक्ती सतत माहिती अधिकाराद्वारे माहिती मागून विनाकारण त्रास देत असल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यांना शिक्षाही होऊ शकते, अशी माहिती सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंह रजपूत यांनी दिली.

ॲड. रजपूत यांनी सांगितले की, आरटीआय कार्यकर्ता असल्याचे सांगून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकी देणे, खंडणीची मागणी करणे, दमदाटी करणे किंवा विनाकारण त्रास देणे, अशा तक्रारीही वाढत आहेत. यांना आळा घालणे आवश्यक आहे. जनमाहिती अधिकारी यांनी विविध शासन निर्णयांचा अभ्यास करून कोणती माहिती द्यावी, कोणती माहिती देऊ नये, याची खातरजमा करावी. 30 दिवसांची वाट न पाहता नियमाला अनुसरून उपलब्ध माहिती द्यावी. जुने, जीर्ण कागद देता येत नाहीत, मात्र निरीक्षणासाठी त्यांना पाहता येतात. माहिती देताना अपिल होणार नाही, अशी द्यावी. यासाठी प्रथम अपिलीय अधिकारी आणि जन माहिती अधिकारी यांच्यामध्ये समन्वय हवा. माहिती नाकारल्यास त्यांची सुस्पष्ट कारणे नमुद करावी, असेही ॲड. रजपूत यांनी सांगितले.

उपलब्ध माहिती आहे तशी द्यावी-संजीव जाधव

नागरिकांनी माहिती अधिकारात मागितलेली माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे तशी द्यावी. अर्थ काढत बसू नये. जनमाहिती अधिकारी, विभागप्रमुख आणि अपिलीय अधिकारी यांच्यामध्ये संवाद हवा. न्यायालयीन, कार्यालयीन चौकशी असलेल्या प्रकरणाची माहिती देता येत नाही. विस्तृत माहिती कार्यालयात बोलावून द्यावी, यामुळे त्यांना पारदर्शीपणा दिसतो, असे अपर जिल्हाधिकारी जाधव यांनी सांगितले.

तहसीलदार श्रीमती कुलकर्णी यांनी माहिती अधिकार, विविध कलमे, कायद्यातील तरतुदी याबाबत विवेचन केले. अव्वल कारकून श्री. कुलकर्णी यांनी माहिती अधिकार कामकाज, विविध शासन निर्णय यांची माहिती दिली. सूत्रसंचालन नायब तहसीलदार संदीप लटके यांनी केले तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती पवार यांनी मानले.

Previous Post

राज्यात केंद्र पुरस्कृत फ्लॅगशीप योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे – मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव

Next Post

आधारशी ई-केवायसी करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी; अन्यथा पुढील हप्ते मिळणार नाहीत

Related Posts

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई
मुख्य बातमी

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
Next Post
आधारशी ई-केवायसी करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी; अन्यथा पुढील हप्ते मिळणार नाहीत

आधारशी ई-केवायसी करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी; अन्यथा पुढील हप्ते मिळणार नाहीत

ताज्या बातम्या

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026