येस न्युज नेटवर्क : शिंदे गटाने शिवसेनेला आज पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन शिंदे गटाने हकालपट्टी केली आहे. वरूण सरदेसाई यांची हकालपट्टी केल्यानंतर शिंदे गटाकडून किरण साळी यांची युवासेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.
शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ आता पक्षाचे खासदारही एकनाथ शिंदे गटात सामील होत असल्याने उद्धव ठाकरे पक्ष वाचविण्यासाठी सरसावले आहेत. आज सायंकाळी सर्व जिल्हाप्रमुख आणि विभागप्रमुखांशी ते ऑनलाईच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. लोकप्रतिनिधी गेले असले तरी संघटनात्मक पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आलेले दिसत आहेत.