दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘हरिजन’ शब्दाऐवजी आता ‘डॉ. आंबेडकर’ शब्द वापरण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल यांनी ‘हरिजन’ शब्दाऐवजी ‘डॉ. आंबेडकर’ शब्द वापरण्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, लवकरच हा निर्णय लागू करण्यात येईल. केजरीवाल सरकारच्या या नव्या नियमांमुळे आता दिल्लीतील वस्ती आणि रोड या ठिकाणांवर ‘हरिजन’ ऐवजी होणार ‘डॉ. आंबेडकर’ शब्दाचा वापर केला जाणार आहे. समाज कल्याण मंत्र्यांनी यासंदर्भात आवश्यक पाऊलं उचलण्यासाठी बैठक बोलावली होती.