येस न्युज नेटवर्क : उत्तर प्रदेशमधील बरेली परिसरात ट्रक आणि रुग्णवाहिकेच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, रग्णवाहिकेच्या चालकाला झोप अनावर झाल्याने हा अपघात झाला. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून, राममूर्ती रुग्णालयाची ही रुग्णवाहिका होती.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-लखनऊ राष्ट्रीय महामार्गावर दिल्लीहून एक रुग्णवाहिका येत होती. या रुग्णवाहिकेत 7 जण बसले होते. हे सातही जण पीलीभितचे रहिवासी असून, दिल्लीहून तपासणी करून परतत होते. त्यावेळी राममूर्ती रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेच्या चालकाला झोप अनावर झाल्याने त्याचा रुग्णवाहिकेवरील ताबा सुटला आणि रुग्णवाहिका थेट बरेलीहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला धडकली. या धडकेत रुग्णवाहिकेत असलेल्या 7 जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये तीन महिला आणि चार पुरूषांचा समावेश आहे.