• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुंबई टेक्सटाईल मर्चंट्स महाजनद्वारे कापड मेळाव्याचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
December 24, 2021
in मुख्य बातमी
0
मुंबई टेक्सटाईल मर्चंट्स महाजनद्वारे कापड मेळाव्याचे आयोजन
0
SHARES
1
VIEWS

फॅब्रिक फेअर – २०२२ चे १० आणि ११ जानेवारीला आयोजन

सोलापूर, ( प्रतिनिधी );- मुंबई टेक्सटाईल मर्चंट्स महाजन (एमटीएमएम) या १८८१ साली स्थापित संघटनेने मुंबईतील सर्वात मोठा बी२बी व्यापार मेळा “एमटीएमएम फॅब्रिक फेअर – २०२२”चे येत्या १० आणि ११ जानेवारी २०२२ रोजी सफायर बँक्वेट हॉल, हॉटेल सहारा स्टार, विले पार्ले (पूर्व), मुंबई येथे आयोजित केला आहे.एमएसएमई उद्योगांतील सर्व सहभागी व अभ्यागतांना एमएसएमईबद्दल मार्गदर्शन व माहिती दिली जाणार आहे.

मुंबई टेक्सटाईल मर्चंट्स महाजनचे मानद अध्यक्ष धीरज कोठारी यांनी सांगितले की, या कापड मेळाव्यात फॉर्मल, कॅज्युअल, एथनिक, किड्स वेअर, युनिफॉर्म फॅब्रिक्स, शर्टिंग, सूटिंग, ड्रेस मटेरियल, इंटरलाइनिंग, बनारसी फॅब्रिक, टेन्सेल, एम्ब्रॉयडरी केलेले कापड, हाताने रंगवलेले कपडे आणि रंगकाम करण्यायोग्य कापडाची विस्तृत श्रेणी प्रदर्शित केली जाणार आहे. महिलांचे वेस्टर्न वेअरसाठी वापरात येणारे कापड, फॅन्सी जॅकार्ड्स, फॅन्सी दुपट्टा, प्युअर लिनेन, लाइक्रा, कुर्तीसाठी उपयुक्त कापड इ. याशिवाय कॉटन, पॉलिएस्टर, ब्लेंडेड, प्युअर सिल्क, आर्ट सिल्क आणि निटवेअर कापडाची विस्तृत श्रेणी येथे मांडली जाईल. या कापड मेळाव्यामध्ये कम्पोझिट मिल्स, आर्ट सिल्क मिल्स, वुलन मिल्स, यंत्रमाग (पॉवर लूम), हातमाग (हॅण्डलूम) क्षेत्रातून निर्मित तसेच आयात कापड देखील प्रदर्शित केले जाईल. बांबू, टेन्सेल फॅब्रिक्स आणि इतर मूल्यवर्धित कापड यांसारखे नवीन शोधलेले तंतू आणि धागे देखील प्रदर्शित केले जातील. डिजिटल, ब्लॉक, स्क्रीन, रोटरी यांसारख्या विशेष श्रेणीसह छपाई केलेले कापड देखील प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्यांना आकर्षित करतील. नाविन्यपूर्ण प्रकारांसह नवीन शैली, नमुने, रंगसंगती असणारी कापडाची श्रेणी येथे असेल.
एमटीएमएमचे सचिव सुनील जे. मजीठिया आणि मेळावा आयोजन समितीचे निमंत्रक भावेश गोराडिया यांच्या मते, कापड मेळाव्याचा उद्देश मुंबईच्या कापड बाजारांचे विशेषत: ‘सी’ प्रभागाचे हरवलेले वैभव परत मिळवून देणे हा आहे. मुंबई पालिकेच्या या ‘सी’ प्रभागामध्ये १५,००० कापड व्यापाऱ्यांसह १० लहान-मोठ्या कापड बाजारपेठा आहेत. दोन दशकांपूर्वी जेव्हा कम्पोझिट मिल्स पूर्ण बहरात होत्या तेव्हा मुंबई हे कापडाचे उत्पादन आणि व्यापाराचे केंद्रस्थान होते. मात्र येथील कम्पोझिट मिल्सचे हे युग अस्त पावले आणि त्यानंतर, सुरत हे क्रमांक एकचे टेक्सटाईल हब बनले आणि अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावरत, तर मुंबईचे स्थान आता तिसऱ्या क्रमांकावर ढकलले गेले आहे. तथापि, अजूनही फॅशन आणि मूल्यवर्धित कापडांचे जन्मस्थान म्हणून मुंबई ओळखली जाते. याशिवाय, सात लाख यंत्रमागांसह भारतातील क्रमांक एकचे यंत्रमाग केंद्र भिवंडी हे मुंबईच्या अगदी जवळ आहे.

हा बी२बी कापड मेळा व्यापारी, वस्त्र उत्पादक, किरकोळ विक्रेते, फॅशन डिझायनर, एजंट हाऊस, आयातदार-निर्यातदार, दलाल, टेलर – वस्त्र रचनाकार, फॅशन बुटीक इत्यादींसाठी विनामूल्य (नोंदणी मात्र अनिवार्य आहे) खुला राहील. पूर्वनोंदणी केल्याशिवाय मेळ्यात प्रवेश दिला जाणार नाही.

हा बी२बी कापड मेळा व्यापारी, वस्त्र उत्पादक, किरकोळ विक्रेते, फॅशन डिझायनर, एजंट हाऊस, आयातदार-निर्यातदार, दलाल, टेलर – वस्त्र रचनाकार, फॅशन बुटीक इत्यादींसाठी विनामूल्य (नोंदणी मात्र अनिवार्य आहे) खुला राहील. पूर्वनोंदणी केल्याशिवाय मेळ्यात प्रवेश दिला जाणार नाही. हा व्यापार ते व्यापार (बी२बी) धाटणीचा मेळा असल्याने सामान्य लोकांना आणि कोणत्याही रिटेलरला या मेळ्यात प्रवेशाला परवानगी दिली जाणार नाही. या विशेष मेळाव्याला बाहेरून मोठ्या संख्येने व्यापारी येण्याची अपेक्षा आहे.

Previous Post

सभागृहात मास्क न वापरण्यावरून अजितदादांचा संताप, मंत्र्यांसह सदस्यांना झापलं

Next Post

आविष्कार मुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी – सिईओ दिलीप स्वामी

Related Posts

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
Next Post
आविष्कार मुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी – सिईओ दिलीप स्वामी

आविष्कार मुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी - सिईओ दिलीप स्वामी

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

August 21, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026