येस न्युज मराठी नेटवर्क : जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे संकट अधिक वाढत चालले आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन अधिक वेगान पसरताना पाहायला मिळतोय. भारतातही ओमायक्रॉनचे वाढते संकट आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांकडून काळजी घेण्याचे आवाहन आणि धोक्याचा इशारा देण्यात येतोय. आता जगातिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक बिल गेट्स यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.
बिल गेट्स यांनी म्हटले आहे की, ”ओमायक्रॉन अतिशय वेगाने पसरतो. मात्र, ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्यामध्ये चांगली बातमी अशी आहे की, एकदा तो एखाद्या देशात प्रबळ झाला की तेथील लाट तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी असते. ते काही महिने वाईट असू शकतात, परंतु मला अजूनही विश्वास आहे की जर आपण योग्य पावले उचलली तर 2022 मध्ये साथीचा रोग संपुष्टात येईल ”