२७ जणांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया
सोलापूर : कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथील माझं गाव, माझी माणसं फाउंडेशनच्यावतीने आदर्श शिक्षक, गुरुवर्य अभिमन्यु सुतार गुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्त लायन्स नेत्र रुग्णालय, सोलापूर आणि पंडित दिनदयाल उपाध्यय दंत महाविद्यालय, केगावच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणप्रसंगी पवार बोलत होते.
सरपंच कोशल्या सुतार, फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक सुतार, सोलापूर महापालिकेचे नगरसेवक नागेश वल्याळ, भाजपचे सरचिटणीस बिज्जु प्रधाने, उत्तर सोलापूरचे गटविकास अधिकारी डॅा. प्रशांत देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॅा. मोहन शेगर, पंचायत समितीचे माजी सदस्य इंद्रजित पवार, भाजप तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संभाजी दडे, माजी सरपंच मल्लिनाथ तंबाके, सहायक पोलिस निरीक्षक नेताजी बंडगर, लोकमंगल बँकेचे संचालक सतिश लामकाने, विकास सोसायटीचे संचालक नागनाथ बन्ने, गुळवंचीचे सरपंच विष्णु भोसले, बाणेगावचे सरपंच लिंबाजी जाधव, ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी बहिर्जे, अशोक बहिर्जे, प्रवीण पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस सुहास भोसले, शिवसेनेचे उपविभागप्रमुख संजय पौळ, उद्योजक बापुसाहेब पाटील, सत्तारभाई शेख, आदी उपस्थित होते.
मोफत आरोग्यशिबिरामध्ये कारंबा, गुळवंची, अकोलेकाटी, बाणेगाव, मार्डी आदी परिसरातून आलेल्या ३५६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात १५५ जणांची नेत्र तपासणी, ५४ जणांची दंत तपासणी, ७७ जणांची बीपी, हदय तपासणी आणि ७० जणांची शुगर तपासणी करण्यात आली. हदयरोग तज्ज्ञ डॅा. मंगेश घोडके, दंत चिकित्सक डॅा. सागर कुंभार, नेत्रतज्ज्ञ डॅा. अनंत बहिरवाडे, ओंकार लॅबोरेटरीचे निती