सोलापूर : प्रभाग क्रमांक सात मधील उमा नगरी ११७ येथील विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा रविवार १२ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता उमा नगरी येथील गणेश मंदिर परिसरात महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते, विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे व माजी नगरसेवक दिपक राजगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून परिवहन माजी सभापती तुकाराम नाना मस्के, विजय पुकाळे, सुरज भैय्या चौहान,उमा नगरीचे चेअरमन नंदाजी कदम, संतोष भाऊ पवार, सचिव बळवंत नारायणकर राम गायकवाड, सुरेश दोडमिसे व समृद्धी ग्रीन अपार्टमेंटचे चेअरमन दिपक कुलकर्णी , सचिव प्रसन्न गायकवाड जितेश कुलकर्णी व प्रसाद गायकवाड हे होते.महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या १५ लाख रुपये निधीतून समृद्धी ग्रीन अपार्टमेंट ते गणेश मंदिर ते गवत्या मारुती हा उमा नगरी मधील मुख्य रस्ता त्याच बरोबर नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या निधी व विशेष प्रयत्नातून तसेच अमोल बापू शिंदे व सारिका ताई पिसे यांच्या सहकार्यातून १)डोंगरे घर ते आतकरे घर,२)शुक्ला मॅडम घर ते लक्ष्मी मंदिर ते डॉक्टर आतकरे घर३)संतोष भाऊ पवार घर ते बंडगर घर व नंदाजी कदम सर घर ते दिपक राजगे मेंबर घर ते कलशेट्टी घर ९ इंची ड्रेनेज लाईन,गावडे घर ते नरखेडकर घर अंतर्गत काँक्रीट असे एकूण (४८.५लक्ष) अठ्ठेचाळीस लाख पन्नास हजार कामाचा शुभारंभ व लोकार्पण यावेळी संपन्न झाला.मागील दहा वर्षात नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी या भागात मूलभूत सुविधा अंतर्गत ९ इंची ड्रेनेज लाईन,मुख्य व अंतर्गत पिण्याचे पाईपलाईन,रस्ते दिवाबत्ती कामे पूर्ण करत विकासाचं मॉडेल म्हणून हा परिसर नावारुपास आणल्याबद्दल महापौर श्रीकांचना यन्नम व विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे यांनी गौरवउदगार काढले.
यावेळी नगरसेवक देवेंद्र कोठे,नंदाजी कदम,राम गायकवाड,जितेश कुलकर्णी ,प्रसाद गायकवाड व महापौरांनी मनोगत व्यक्त केले.सौ. सुवर्णा पाटील व सौ.शकुंतला राऊत यांच्या हस्ते महापौरांचा सत्कार करण्यात आला.कु.राजनांदनी लक्ष्मण सदरखेड ही गोवा ऑल इंडिया नॅशनल स्केटिंग मध्ये प्रथम आल्याबद्दल महापौरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आले.