• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विभागातील 3 हजार 900 एसटी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतनाची प्रतीक्षा

Yes News Marathi by Yes News Marathi
August 16, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूर विभागातील 3 हजार 900 एसटी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतनाची प्रतीक्षा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : जुलै महिन्याचे ऑगस्ट महिन्यात सात तारखेला मिळणारे वेतन अद्याप झाले नसल्याने सोलापूर विभागातील 3 हजार 900 एसटी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतनाची अद्यापही प्रतीक्षाच करावी लागत आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागात एकूण 3 हजार 900 कर्मचारी कार्यरत आहेत. यात 1 हजार 300 चालक, 1 हजार 300 वाहक व 1 हजार 300 इतर प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. सोलापूर विभागात एकूण नऊ आगार आहेत. सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी एसटीचे महिन्याला लाखो रुपये खर्च होतात.

परंतु मागील दीड वर्षापासून वेतन होते की नाही अशी चिंता प्रत्येक महिन्यात कर्मचाऱ्यांना वाटत आहे. कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. तेव्हापासून एसटीच्या संचित तोट्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे एसटीची आर्थिक स्थिती हलाखीची बनली आहे. एसटीचे शासनात विलिनीकरण करण्याची मागणी संघटनांनी केली आहे. एसटीचे शासनात विलिनीकरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील काही संघटनांनी दिला आहे.ज्याप्रमाणे शासनाने राज्यातील विविध 31 महामंडळांतील कार्यरत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे, मग एसटी महामंडळाचा समावेश का केला जात नाही, असा सवाल उपस्थित होत असताना, एसटी महामंडळ तोट्यात असल्याचे कारण शासनाकडून पुढे केले जात आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील लोकांची जीवनवाहिनी म्हणून एसटीला ओळखले जाते. एसटीच्या प्रवासावर लोकांचा मोठा विश्वास आहे. मात्र शासन याकडे दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्न कामगार संघटनांनी उपस्थित केला आहे.कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून एसटी कर्मचाऱ्यांचे सात तारखेला होणारे वेतन वेळेवर होत नसल्याने कर्मचाऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महिनाभर काम करून देखील वेतनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. कोरोनामुळे एसटीची प्रवासी वाहतूक कधी सुरू तर कधी बंद होत असल्याने राज्य परिवहन महामंडळाकडे वेतन देण्यासाठी देखील पैशांची चणचण भासत असल्याने याचा कर्मचाऱ्यांना फटका बसत आहे.

Previous Post

डिग्री कॉलेज ऑफ फ़ाइन आर्ट आयोजित चर्चा सत्रात जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघाचा सहभाग

Next Post

अधिकारी, व्यापाऱ्यांमधील बैठकीत गोंधळ; व्यापारी आंदोलनावर ठाम

Related Posts

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!
इतर घडामोडी

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

June 22, 2026
Next Post
अधिकारी, व्यापाऱ्यांमधील बैठकीत गोंधळ; व्यापारी आंदोलनावर ठाम

अधिकारी, व्यापाऱ्यांमधील बैठकीत गोंधळ; व्यापारी आंदोलनावर ठाम

ताज्या बातम्या

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026