आमदार यशवंत माने यांनी केले सोमनाथ माळीचे अभिनंदन
सोलापूर : मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सरकोली(ता.पंढरपूर) या गावातील अत्यंत गरीब कुटूंबातील सोमनाथ नंदू माळी या युवकानी अत्यंत खडतर परिस्थितीत शिक्षण घेत भारतात दहा मध्ये तर महाराष्ट्रातुन एकमेव निवड होऊन थेट इस्त्रो मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ होण्याचा मान मिळविला असून सोमनाथ माळी च्या यशामुळे जगात पंढरपूर चे नावलौकिक प्राप्त झाले आहे. असे गौरवउदगार आमदार यशवंत माने यांनी केले आहे.
शुक्रवार(दि१८) रोजी मोहोळ येथे इस्त्रो शास्त्रज्ञ सोमनाथ माळी याचा आमदार यशवंत माने व पंचायत समिती सदस्य अजिंक्य राणा पाटीलयांच्या हस्ते सोमनाथचा सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन पाटील,हरी रानगर,बाहुबली सावळे,सोमनाथ चे वडील नंदु माळी उपस्थित होते.