• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘ओमाज’ : सोलापूरातील पहिले लाईफस्टाईल कन्सेप्ट स्टोअर

Yes News Marathi by Yes News Marathi
June 19, 2021
in मुख्य बातमी
0
‘ओमाज’ : सोलापूरातील पहिले लाईफस्टाईल कन्सेप्ट स्टोअर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर बनणार पारंपारिक कलांचा वारसा जपणारे शहर

सोलापूर : ‘ओमाज’ हे सोलापूरातील पहिले आणि एकमेव लाईफस्टाईल कन्सेप्ट स्टोअर सोलापूरकरांसाठी तसेच सोलापूरात येणाऱ्या पर्यटकांसाठी उपलब्ध झाले आहे. हॉटेल बालाजी सरोवर येथील या अनोख्या सांस्कृतिक व कलात्मक दालनामध्ये देशाच्या विविध प्रांतातील कारागीरांनी बनविलेल्या दुर्मिळ पारंपारिक वस्तू उपलब्ध होतील. ‘ओमाज’च्या संस्थापक मयुरा दावडा-शहा तसेच डॉ. सुहासिनी शहा यांनी शनिवारी (दि. १९) पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

‘ओमाज’मध्ये कपडे, बेडींग, डायनिंग, हेल्थ व वेलनेस, ज्वेलरी, ऍक्सेसरीज, गिफ्ट्स अशा विविध कॅटेगरीमधील कलात्मक वस्तूंचा समावेश असेल. तसेच सोलापूरात तयार होणाऱ्या साड्या, चादरी, टॉवेल, वॉल हँगिंग्ज अशा वैशिष्ट्यपूर्ण वस्तूही असतील. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते रात्री ९ आणि रविवारी सकाळी १० ते रात्री ११ या वेळेत हे दालन सुरु असेल. सांस्कृतिक विविधता असणाऱ्या भारताच्या कानाकोपऱ्यातील विस्मृतीत चाललेल्या कलाकौशल्यांचे पुनरुज्जीवन करणे आणि तेथील कारागीरांच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हीच ‘ओमाज’च्या मागची संकल्पना आहे. या दालनाच्या निमित्ताने सोलापूर हे देशाच्या विविध प्रांतातील कलात्मक वस्तूंचा वारसा जपणारे शहर म्हणून नावाजले जाईल. पारंपारिक पद्धतीने बनविलेल्या विविध वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होणे, ही केवळ सोलापूरकरांसाठी नव्हे तर सोलापूरात येणाऱ्या पर्यटकांसाठीही पर्वणीच ठरेल.

या दालनाचे वैशिष्ट्य म्हणजे, यासाठी पूर्णतः महिलांनी पुढाकार घेतला आहे. मयुरा दावडा-शहा यांची ही संकल्पना असून त्यांना अमृता गायकवाड, सुनंदा गोटे, युक्ती गणेरीवाल, इक्षिका सांग्री, आयुशी बोथरा, प्रियांका जयप्रकाश, मित्तल पटेल यांची साथ मिळाली आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, या दालनात दर काही महिन्यांनंतर वेगवेगळ्या थीम असतील. प्रत्येक थीममध्ये एका प्रांतातील कलात्मक वस्तू, त्यांची त्या प्रांताच्या संस्कृतीला साजेशी मांडणी व सजावट, तेथील लोकसंगीत यांचा समावेश असेल. या माध्यमातून त्या प्रांताच्या संपूर्ण संस्कृतीचा वेगळा अनुभव घेता येणार आहे. तसेच वेळोवेळी विविध हस्तकलांचे प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळाही आयोजित केल्या जाणार आहेत. यामध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्रात वेगळेपण जपणाऱ्या कलाकार व कारागीरांना सामावून घेतले जाणार आहे. विशेष म्हणजे या दालनातील प्रत्येक वस्तू ही पर्यावरण पूरक घटकांपासून बनविली गेली असून ‘ओमाज’च्या टीमने स्वतः देशभरातील हजारो कारागीरांशी प्रत्यक्ष संपर्क साधून तपासून निवडली आहे.

मयुरा दावडा-शहा यांनी अमेरिकेत उद्योजकता व व्यवस्थापनाचे शिक्षण घेत असताना २०१५ साली अशाच प्रकारची कॉन्सेप्ट घेऊन ‘फॅसेट’ हे विविध देशांतील कलात्मक वस्तूंचा समावेश असणारे सांस्कृतिक दालन साकारले होते. पाश्चात्य देशांमध्ये ही संकल्पना खूपच लोकप्रिय असल्याने तेथील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आपल्या सोलापूर शहरातही असे वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कलात्मक दालन असावे या उद्देशाने त्यांनी ‘ओमाज’साठी पुढाकार घेतला. ‘ओमाज’मुळे सोलापूरची दखल जागतिक पातळीवर घेतली जाईल व ‘स्मार्ट सोलापूर’चे हे एक प्रमुख आकर्षण ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अधिक माहितीसाठी hellohommage@gmail.com या मेल आयडीवर किंवा ९३७०८४८२४६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Previous Post

सोमनाथ माळीच्या यशाने जगात पंढरपूरचे नावलौकिक

Next Post

आषाढी एकादशीला दहा मानाच्या पालख्यांचा ” लाल परी “तून प्रवास – परिवहन मंत्री

Related Posts

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात
मुख्य बातमी

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026
Next Post
आषाढी एकादशीला दहा मानाच्या पालख्यांचा ” लाल परी “तून प्रवास – परिवहन मंत्री

आषाढी एकादशीला दहा मानाच्या पालख्यांचा " लाल परी "तून प्रवास - परिवहन मंत्री

ताज्या बातम्या

कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026