१० तालुक्यात १०० पेक्षा कमी रुग्ण
सोलापूर : जिल्ह्याचा covid-19 चा शनिवार दिनांक ५ जूनचा अहवाल प्राप्त झाला आहे . शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यामध्ये ४६० व्यक्तींना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे . या कालावधीत ५८२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत तसेच २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय आढावा घेतला असता माळशिरस तालुक्यात १०७ नवीन व्यक्तींना कोरोना झाला आहे. माळशिरस वगळता सर्व दहा तालुक्यांमध्ये नवीन कोरोना बाधितांची संख्या १०० पेक्षा कमी आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात अवघे ३ तर दक्षिण सोलापूर तालुक्यात अवघे ६ नवीन रुग्ण आढळले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या अजूनही चिंता वाढवणारी आहे . शुक्रवारी रात्री १२ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यामध्ये 23 कोरणा बाधित यांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये अक्कलकोट तालुक्यात ५ , बार्शी , माळशिरस, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यात प्रत्येकी ४ आणि सांगोला तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.

