सोलापूर : पोलीस आयुक्तालय सोलापूर शहराअंतर्गत पोलीस ठाणे स्तरावरील सापडलेले ४८ मोबाईल परत करणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर यांनी म्हटले आहे. ह्या मोबाईलची किंमत 22 हजार 400 रुपये आहे सदरचे मोबाईल ट्रेस करण्याकरता ठेवण्यात आले होते . मोबाईल कंपनीकडून तांत्रिक माहिती उपलब्ध झाल्यानंतर आता ते मोबाईल परत करण्यात येणार आहेत.

