१५ मृतांमध्ये २४ वर्षाच्या तरुणाचा समावेश
येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहराचा १७ मे रोजी चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला असून नवीन ६१ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे . रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या व्यक्तींची संख्या ४८ आहे. या कालावधीत १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. प्रभागनिहाय रुग्णांची स्थिती पाहिली असता प्रभाग क्रमांक २४ मध्ये १६, प्रभाग क्रमांक २३ मध्ये १० , प्रभाग क्रमांक २ मध्ये ५ व्यक्तींना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या १५ जणांमध्ये गवळी वस्ती लक्ष्मी पेठ परिसरातील २४ वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे. या तरुणाला ६ मे रोजी मार्कंडेय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान १६ मे रोजी सकाळी साडेसात वाजता त्याचे निधन झाले. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.