• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 2, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कोरोना विरुद्ध लढाई कठीण होणार आहे, सज्ज राहा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

by Yes News Marathi
May 16, 2021
in मुख्य बातमी
0
कोरोना विरुद्ध लढाई कठीण होणार आहे, सज्ज राहा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क । कोरोनाविरोधातील लढ्यासाठी ठाकरे सरकारकडून राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाउन लावण्यात आला आहे. एकीकडे कठोर निर्बंध लावण्यात आले असताना दुसरीकडे करोनाला रोखण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सच्या सदस्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील अनेक डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डॉक्टरांसमोर ‘माझा डॉक्टर’ अशी संकल्पना मांडत करोनाविरोधातील लढाईत मैदानात उतरण्याचं आवाहन केलं. डॉक्टर संजय ओक, डॉक्टर शशांक जोशी, डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर राहुल पंडित यावेळी उपस्थित होते.

कोविडची लढाई मोठी आहे भयानक आणि जीवघेणी आहे. या लढाईत लढण्यासाठी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांना सोबत येण्यासाठी मी साद घालत असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

गेल्या वर्षी अंधार असताना तज्ज्ञ डॉक्टरांची मोठी मदत झाली. आपल्याकडे उपचार पद्धती काय असली पाहिजे, कशावर कौणतं औषध आणि किती प्रमाणात द्यावं यासाठी मार्गदर्शक तत्वं तयार केली आहेत असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. माझा डॉक्टर संकल्पना मांडताना उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, “जगातील प्रत्येक घरात एक तज्ज्ञ डॉक्टर असतो. प्रत्येकाकडे आपला एक डॉक्टर असतो, त्याचा सल्ला घेऊनच लोक निर्णय घेत असतात. आपल्याही कुटुंबाचा एक फॅमिली डॉक्टर असतो. त्याच्याकडे कुटुंबातील प्रत्येकाची माहिती असते,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

Previous Post

सोलापूर महापालिका 15 ठिकाणी सुरू करणार मुलांसाठी फिवर ओपीडी

Next Post

कुंभारी रस्त्यावरील पेट्रोल पंपावर दगडफेक….

Next Post
कुंभारी रस्त्यावरील पेट्रोल पंपावर दगडफेक….

कुंभारी रस्त्यावरील पेट्रोल पंपावर दगडफेक….

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In