येस न्युज मराठी नेटवर्क ; अकलूज येथील एका आरोपीस माळशिरस येथील एसटी स्थानकावर सोलापूर ग्रामीणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे व त्यांच्या पथकाने नुकतीच अटक केली आहे . हा आरोपी एक मे २०१६ पासून फरार होता. फरार कालावधीत देखील त्याने विविध गुन्हे केले होते. माळशिरस पोलिस ठाण्यात मोबाईल चोरी प्रकरणी त्याच्या विरूद्ध भारतीय दंड विधान कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरार आरोपी राजू संजय जाधव हा तिरवंडी रोड, माळशिरस येथे राहणारा असून गेली पाच वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई यशस्वी केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.