येस न्युज मराठी नेटवर्क : सांगोला येथील राजाराम कॉम्प्लेक्स मधील एस एस मोबाईल शॉपीमधून 26 जानेवारी रोजी चोरीस गेलेले 33 मोबाइल्स आणि एक टॅब असा जवळपास ६ लाख ८ हजार 838 रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात सांगोला पोलिस आणि सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे .पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने या गुन्ह्याचा तपास केला होता . 26 जानेवारी रोजी दुकानाचे लोखंडी शटर गॅस भरधाव कटरच्या साह्याने कट करुन दुकानातील दहा लाख 69 हजार 40 रुपयांच्या माल तसेच 1 लाख 62 हजार रुपये रोख असा 12 लाख 31 हजार 44 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या गुन्ह्यात तातडीने शोध लावून आरोपींना अटक करणाऱ्या पोलीस पथकाचा गौरव केला आहे.