येस न्युज मराठी नेटवर्क : काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, अशा सूचना सरकारकडून वारंवार देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यांत आता संचारबंदी लागू करण्यात येत आहे. साताऱ्यातही कोरोनाचा पुढील धोका विचारात घेऊन जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात आलीय. या संचारबंदीतून जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांना वगळण्यात आले आहे.