येस न्युज मराठी नेटवर्क : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंदृपाच्या अप्पर तहसीलदार उज्वला सोरटे यांना त्वरित निलंबित करावे ,अशी मागणी काँग्रेस नेते डॉक्टर बसवराज बगले यांनी केले आहे. कारवाई न झाल्यास सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे .बाळासाहेब शेळके यांनी केलेल्या तक्रारीनंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चौकशीचे आदेश दिले असल्याचे देखील बगले यांनी सांगितले. 18 फेब्रुवारी रोजी एका तलाठ्याच्या मोबाईल वरून आपल्याला अपशब्द वापरून सोरटे यांनी मानहानी केल्याचा दावा केला असून केल्याची धमकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे.