• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कृषि योजनांसाठी प्रथमच ऑनलाईन सोडत पारदर्शक पद्धतीने २ लाख शेतकऱ्यांची निवड – कृषि मंत्री दादाजी भुसे यांची माहिती

Yes News Marathi by Yes News Marathi
February 13, 2021
in इतर घडामोडी
0
कृषि योजनांसाठी प्रथमच ऑनलाईन सोडत पारदर्शक पद्धतीने २ लाख शेतकऱ्यांची निवड – कृषि मंत्री दादाजी भुसे यांची माहिती
0
SHARES
0
VIEWS

मुंबई, दि. १३ : शेतकऱ्यांनी केलेल्या एकाच अर्जावर कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नुकतीच प्रथमच ऑनलाईन सोडत काढण्यात आली. त्याद्वारे राज्यातील २ लाख शेतकऱ्यांची पारदर्शकपणे निवड करण्यात आली आहे. यांत्रिकीकरण, सूक्ष्मसिंचन, विशेष घटक योजना, नविन विहीरी व फलोत्पादनाच्या विविध बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. ज्यांची निवड झाली आहे त्यांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार आहे.

यापूर्वी कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना योजनानिहाय वेगवेगळे अर्ज करावे लागत होते. तसेच अर्ज केलेल्या आर्थिक वर्षात योजनेचा लाभ मिळाला नाही तर पुढील आर्थिक वर्षात नव्याने अर्ज करावा लागायाचा त्याचबरोबर प्रत्येक अर्जासोबत कागदपत्रेही स्वतंत्रपणे जोडावी लागत होती. ही बाब लक्षात घेऊन कृषि विभागाच्या सर्व योजनांसाठी एकच अर्ज करण्यासाठी महाडीबीटी प्रणाली विकसित करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गावातुनच अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली तसेच आवश्यक कागदपत्रे एकदाच जोडण्याची सोय झाल्याने प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्रपणे कागदपत्रे सादर करण्याची गरज राहली नाही. या आर्थिक वर्षात जर शेतकऱ्यास लाभ मिळाला नाही तर पुढील आर्थिक वर्षात शेतकऱ्यास नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. शेतकऱ्याचा मागील वर्षाचा अर्ज पुढील वर्षीही ग्राह्य धरण्यात येणार आहे, असे कृषीमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

नव्याने विकसित केलेल्या या प्रणालीस राज्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. ११ लाख ३४ हजार शेतकऱ्यांनी या प्रणालीवर नोंदणी करुन विविध योजनांतर्गत मागणी नोंदवली. प्रत्येक योजनेच्या आर्थिक लक्षांकानुसार राज्यातील २ लाख शेतकऱ्यांची ऑनलाईन सोडतीद्वारे निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने यांत्रिकीकरण, सिंचनाच्या विविध बाबी, फलोत्पादन, नवीन विहीरी बांधणे आदी विविध बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना महाडीबीटी प्रणालीवर लॉग इन करुन त्यांच्या निवडीबाबतची माहिती मिळू शकते तसेच या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर निवडीबाबत संदेशही प्राप्त होतील. जे शेतकरी निवडीनंतर मुदतीत घटकांची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांची निवड रद्द करुन संगणकीयप्रणालीद्वारे प्रतिक्षा यादीतील क्रमवारीनुसार पुढील शेतकऱ्यांची निवड केली जाईल. तसेच ज्या शेतकऱ्यांची चालु आर्थिक वर्षात निवड होणार नाही त्यांचे अर्ज पुढील आर्थिक वर्षात ऑनलाईन सोडतीसाठी विचारात घेण्यात येतील त्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.

Previous Post

शरद पवार यांच्या कृषी कायद्यावरून कोलांटउड्या…

Next Post

रणबीर कपूरची ‘रेंज रोवर’ पोलिसांच्या ताब्यात..!

Related Posts

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!
इतर घडामोडी

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’
इतर घडामोडी

गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

August 12, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
इतर घडामोडी

रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 11, 2026
भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!
इतर घडामोडी

भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!

August 11, 2026
Next Post
रणबीर कपूरची ‘रेंज रोवर’ पोलिसांच्या ताब्यात..!

रणबीर कपूरची ‘रेंज रोवर’ पोलिसांच्या ताब्यात..!

ताज्या बातम्या

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026