माळशिरस तालुक्यात सर्वाधिक २०० नवीन रुग्ण
सोलापूर : जिल्ह्याचा १४ जुलैचा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यामध्ये नव्याने ५१६ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. २६२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे . कोरोना बाधित रुग्णांचा तालुकानिहाय आढावा घेतला असता माळशिरस तालुक्यात सर्वाधिक २०० व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. सांगोला तालुक्यात ८० , पंढरपूर तालुक्यात ७९ व्यक्तींना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे. म्यूकरमायकोसिसचे आज नवीन दोन रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत.










