सोलापूर : जिल्ह्याचा गुरूवार दिनांक १७ जून चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला आहे बुधवारी रात्री बारा वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यामध्ये नवीन ४२३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे या कालावधीत ३७९ व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत. आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. कोरोना बाधितांचे चा तालुका निहाय आढावा घेतला असता माळशिरस तालुक्यात सर्वाधिक १११ नवीन रुग्ण आढळले आहेत इतर सर्व तालुक्यांमध्ये १०० पेक्षा कमी नवीन रुग्ण आहेत. मंगळवेढा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे अवघे २ नवीन रुग्ण आढळले असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.