इरशाळवाडी पुनर्वसनासाठी बालाजी फाउंडेशनकडून २५ लाखांची मदत

0
40

दि. १९ जुलैची रात्र इरशाळवाडी ग्रामस्थांसाठी दुर्दैवी ठरली, बालाजी अमाईन्स संचालित संस्था बालाजी फाउंडेशनने आपली संवेदना जपत तत्परतेने ट्रकभरुन राशन, जीवनोपयोगी साहित्य आणि औषधे पाठवून दिले.

इरशाळवाडी ग्रामस्थांच्या भवितव्याचे विचार करुन त्यांच्या पुनर्वसनासाठी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी २५ लाखांची मदत राज्य शासनाकडे सुपूर्द केले. दि. २४ जुलै रोजी मुंबई येथील विधानभवनात बालाजी अमाईन्सचे जनसंपर्क अधिकारी विनोद चुंगे यांनी २५ लाखांचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री धनंजय मुंढे हेही उपस्थित होते.