• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपूर येथे दर्शन मंडप व स्काय वॉकसाठी ११० कोटीच्या आराखड्यास मान्यता

Yes News Marathi by Yes News Marathi
August 17, 2024
in मुख्य बातमी
0
पंढरपूर येथे दर्शन मंडप व स्काय वॉकसाठी ११० कोटीच्या आराखड्यास मान्यता
0
SHARES
0
VIEWS
  • बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला दर्शन मंडप व स्काय वॉकचा प्रश्न जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मार्गी लागणार
  • जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या 129 कोटीच्या आराखड्यापैकी राज्याच्या मुख्य सचिव सुनीता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने 110 कोटीचा आराखडा मंजूर केला

सोलापूर : पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात. तसेच आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्र या मोठ्या वाऱ्यांना दहा ते वीस लाख भाविक दर्शनासाठी येतात व रांगेत उभे राहतात. वर्षभरात जवळपास एक कोटी भाविक पंढरपूर येथे येतात. सध्याची दर्शन रांग व्यवस्था अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे दर्शन मंडप व स्काय वॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने 129 कोटीचा आराखडा तयार केलेला होता. या अनुषंगाने दिनांक 16 ऑगस 2024 रोजी राज्याच्या मुख्य सचिव सुनिता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्च अधिकार समितीच्या बैठकीत दर्शन मंडप व स्काय वॉक साठी 110 कोटी चा आराखडा समितीने मंजूर केलेला आहे.

श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेत जास्त वेळ उभे राहू नये व रांगेत भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध हव्यात यासाठी मागील अनेक वर्षापासून दर्शन मंडप व स्काय वॉक तयार करण्याबाबत प्रयत्न सुरू होते. हा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला व भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर येथे पदभार घेतल्यापासून पाठपुरावा सुरू केला.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यामध्ये कोणत्याही भाविकाला दर्शन रांगेत त्रास होऊ नये या अनुषंगाने सर्व सोयी सुविधा रांगेत उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेले होते. त्यानुसार पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर यांनी सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेला 129 कोटीचा आराखडा कार्यकारी समितीला सादर केला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीने या आराखड्याला मान्यता प्रदान केली. त्यानंतर हा आराखडा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीत सादर करण्यात आला व या समितीनेही या आराखड्याला मान्यता दिली.

जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिलेला दर्शनमंड व स्काय वॉक आराखडा पुढील मान्यतेसाठी राज्याच्या मुख्य सचिव सुनिता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्च अधिकार समितीकडे पाठवण्यात आला. दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधकार समितीने जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिलेला 129 कोटीचा आराखडा सविस्तरपणे पाहून त्यातील 110 कोटीला मान्यता दिलेली आहे. उच्चाधिकार समितीने मान्यता दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सदस्य आसलेल्या राज्य शिखर समितीकडे हा आराखडा सादर केला जाईल. साधारणत: सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत राज्य शिखर समितीचे बैठक होऊन पंढरपूरच्या दर्शन मंडप व स्काय वॉक आराखड्यास अंतिम मान्यता मिळेल व त्यानंतर लवकरच शासन निर्णय निघेल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

Previous Post

सोमवारी सोलापूर शहरातील हे मार्ग राहणार बंद शहर पोलीस आयुक्तांनी दिली माहिती..

Next Post

‘दक्षिण’ मध्ये सोमनाथ वैद्यकडून गावोगावी आणि शहरातील विविध मंदिरात महाप्रसाद, छत्री वाटपाचा धडाका

Related Posts

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

June 30, 2026
“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड
मुख्य बातमी

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

June 29, 2026
TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…
मुख्य बातमी

TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…

June 29, 2026
TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…
मुख्य बातमी

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…

June 28, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”
मुख्य बातमी

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…
मुख्य बातमी

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
Next Post
‘दक्षिण’ मध्ये सोमनाथ वैद्यकडून गावोगावी आणि शहरातील विविध मंदिरात महाप्रसाद, छत्री वाटपाचा धडाका

'दक्षिण' मध्ये सोमनाथ वैद्यकडून गावोगावी आणि शहरातील विविध मंदिरात महाप्रसाद, छत्री वाटपाचा धडाका

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या   -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 30, 2026
आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 30, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026