• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोरोना संकटकाळात कौशल्य विकासमार्फत 1 लाख 32 हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार – नवाब मलिक

Yes News Marathi by Yes News Marathi
December 16, 2020
in मुख्य बातमी
0
कोरोना संकटकाळात कौशल्य विकासमार्फत 1 लाख 32 हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार –  नवाब मलिक
0
SHARES
1
VIEWS
मुंबई, दि. 16 : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली. पण कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे लॉकडाऊनच्या काळात नोव्हेंबरअखेरपर्यंत राज्यात एकुण 1 लाख 32 हजार 308 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

        नोव्हेंबर महिन्यात 16 हजार 380 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. चालू वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान एकूण 1 लाख 64 हजार 723 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती मंत्री  मलिक यांनी दिली.

        कौशल्य विकास मंत्री मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.

मुंबईत नोव्हेंबरमध्ये ९ हजार ९२३ जणांना रोजगार

        माहे नोव्हेंबरमध्ये विभागाकडे ३५ हजार २१४ इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात १३ हजार २८४, नाशिक विभागात ४ हजार ०४६, पुणे विभागात ९ हजार २११, औरंगाबाद विभागात ६ हजार ०२३, अमरावती विभागात १ हजार ४२३ तर नागपूर विभागात १ हजार २२७ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

        माहे नोव्हेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १६ हजार ३८० उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ९ हजार ९२३, नाशिक विभागात १ हजार १४१, पुणे विभागात ४ हजार ०६८, औरंगाबाद विभागात ७७२, अमरावती विभागात ३२१ तर नागपूर विभागात १५५ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

ऑनलाईन महारोजगार मेळावा आता २० डिसेंबरपर्यंत

दरम्यान, राज्यात नुकत्याच १२ आणि १३ डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यास उमेदवार व उद्योजकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने या मेळाव्याचा कार्यक्रम आता २० डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आला असल्याची घोषणा मंत्री श्री. मलिक यांनी केली. बेरोजगार तरुण व उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा. नोकरीइच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. व्हॉटस्ॲप, स्काईप, झूम इत्यादी माध्यमांद्वारे ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतात. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

Previous Post

मॅट्रिमोनिअल साईटवरून होणाऱ्या सायबर गुन्हेगारीविषयी जनजागृतीपर वेबिनारचे उद्घाटन

Next Post

निकाला बाबतच्या भोंगळ कारभाराविरुद्ध अभाविपचे सोलापूर विद्यापीठात आंदोलन

Related Posts

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक
मुख्य बातमी

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!
मुख्य बातमी

अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!

September 11, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा
मुख्य बातमी

महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा

September 10, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
मुख्य बातमी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

September 10, 2026
‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !
मुख्य बातमी

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

September 10, 2026
महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !
मुख्य बातमी

महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

September 10, 2026
Next Post
निकाला बाबतच्या भोंगळ कारभाराविरुद्ध अभाविपचे सोलापूर विद्यापीठात आंदोलन

निकाला बाबतच्या भोंगळ कारभाराविरुद्ध अभाविपचे सोलापूर विद्यापीठात आंदोलन

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

September 11, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026