• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आजपासून अधिक मास प्रारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
September 18, 2020
in इतर घडामोडी
0
आजपासून अधिक मास प्रारंभ
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : आपला भारत देश जसा विविधतेने नटलेला आहे. तसेच आपली संस्कृती, परंपरा, सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, चालिरिती यांमध्येही वैविध्य आढळून येते. संपूर्ण वर्षभरात विविध प्रकारची व्रत-वैकल्ये, सण-उत्सव आपण साजरे करत असतो. बारकाईने विचार केल्यास आपल्याकडील व्रत-वैकल्ये, सण-उत्सव आपण निसर्ग, विज्ञान, व्यवहारिकता यांच्या आधारावर साजरे करत असतो. प्राथमिकदृष्ट्या आपल्याला ते जाणवत नाही. मात्र, त्यामागे विचारांची, तत्त्वांची आणि संस्कारांची एक पक्की बैठक असल्याचे दिसून येते.

मराठी नववर्षात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. मात्र, त्यातील सर्वांत महत्त्वाचा आणि विशेष कालखंड म्हणजे चातुर्मास. यंदाचा चातुर्मास विशेष ठरणारा आहे. सन २०२० मधील चातुर्मास महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे अधिक महिना. अधिक महिन्यामुळे यावर्षीचा चातुर्मास हा पाच महिन्याचा झाला आहे. अधिक महिन्याला विविध नावांनी संबोधले जाते. त्याला मलमास, पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. मात्र, सन २०२० मधील चातुर्मास अत्यंत शुभ मानला गेला आहे. अधिक महिन्याचे वैशिष्ट्य, महत्त्व, रहस्य यांबाबत जाणून घेऊया…

सन २०२० मधील अधिक महिना हा अत्यंत शुभ मानला गेला आहे. यंदा १६० वर्षांनंतर अद्भूत योग जुळून आला असून, यानंतर १९ वर्षांनी म्हणजेच सन २०३९ मध्ये असा शुभ योग जुळून येईल, असे सांगितले जाते आहे. याविषयीची अधिक माहिती ज्योतिषी डॉ. आरती दहिया यांनी दिली आहे. मराठी पंचांगानुसार दर अडीच ते तीन वर्षांनी एक महिना अधिक येतो. म्हणजचे ते वर्ष तेरा महिन्यांचे असते. अधिक मास येण्याची पद्धत पूर्णपणे खगोलशास्त्रीय आहे. सूर्याधरित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांत अधिक महिना नसतो. तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांत पाळला जातो.

​मलमास का म्हटले जाते?

पृथ्वीवरून पाहाताना सूर्य दररोज सरासरी एक अंश पुढे सरकल्यासारखा वाटतो. दर ३० दिवसांनी तो ३० अंशांची एक रास पुढे सरकतो. सूर्याच्या या राशीबदलाला ‘सूर्यसंक्रांत’ अथवा ‘सूर्य संक्रमण’ असे म्हणतात. एक सौर वर्ष ३६५ दिवसांचे असते. तर, एक चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे असते. दोन्ही कॅलेंडरमधील फरक दरवर्षी वाढत राहू नये, याकरिता चांद्रवर्षामध्ये ठराविक कालावधीनंतर एक महिना वाढीव म्हणजेच ‘अधिक’ घेतला जातो. याचा परिणाम म्हणून एखाद्या चांद्रमासात एकही सूर्यसंक्रांत होत नाही. या चांद्रमासाला ‘अधिक मास’ म्हटले जाते. या महिन्यात सूर्य सक्रांत होत नसल्यामुळे हा महिना मलमास म्हणून ओळखला जातो.

कधीपासून सुरू होणार अधिक मास? वाचा, शास्त्र, महत्त्व व मान्यता

​अधिक मास आमि निज मास

कोणत्याही मराठी वर्षातील अधिक महिना हा प्रथम येतो आणि त्यानंतर नीज म्हणजे नियमित महिना सुरू होतो. सन २०२० मध्ये अश्विन हा अधिक महिना आहे. त्यामुळे १८ सप्टेंबर २०२० ते १६ ऑक्टोबर २०२० हा अधिक अश्विन महिना असेल आणि १७ ऑक्टोबर २०२० ते १५ नोव्हेंबर २०२० या कालावधीत निज म्हणजेच नियमित अश्विन महिना असेल. यामुळेच सर्वपित्री अमावास्या आणि घटस्थापना म्हणजेच नवरात्रीत तब्बल एका महिन्याचे अंतर आले आहे. शनिवार, १७ ऑक्टोबर २०२० रोजी घटस्थापना करून नवरात्र साजरे केले जाईल.

​अधिक महिन्याचे महत्त्व

अधिक महिना हा श्रीविष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे. पाणी, अग्नि, आकाश, वायु आणि पृथ्वी यांना पंचमहाभूते म्हटले जाते. चिंतन, मनन, ध्यानधारणा, नामस्मरण, उपासना, योगासने यांच्या माध्यमातून शरीरातील पंचमहाभूतांमध्ये संतुलन आणि नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक महिना सर्वोत्तम मानला गेला आहे. या संपूर्ण महिन्यात धार्मिक आणि आध्यात्मिक प्रयत्नांनी प्रत्येक व्यक्ती भौतिक तसेच आध्यात्मिक उन्नती करू शकतो, असे मानले जाते. अधिक महिन्यातील नामस्मरण, उपासना, आराधना, जप यांच्या माध्यमातून कुंडलीतील अनेक दोषांचे निवारण करू शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अधिक महिन्यात करण्यात येणारी पूजा, पठण यांचे पुण्य नियमित काळात केलेल्या पूजन, अर्चनेपेक्षा १० पट अधिक मिळते, असे सांगितले जाते.

​अधिक महिन्यात काय करू नये?

पितृपक्ष पंधरवड्याप्रमाणे अधिक महिन्यात प्राणप्रतिष्ठा, स्थापना, मुंज, विवाह, वास्तुशांती, गृहप्रवेश, बारसे, यज्ञोपवित यांसारखी धार्मिक, मंगलकार्ये केली जात नाहीत. परंतु जागेची खरेदी, वाहनाची खरेदी, विवाह मीलनासाठी पत्रिका पाहणे, डोहाळे जेवण, जननशांती, पंचाहत्तरी यांसारख्या शांती आदी कार्ये करता येतात. अधिक महिन्यात दररोज नियमितपणे करण्यात येणारी अन्य धार्मिक कार्ये सुरूच ठेवावीत. या संपूर्ण महिन्यात व्रत, तीर्थ स्नान, भागवत पुराणासह अन्य धार्मिक ग्रंथांचे अध्ययन, विष्णू यज्ञ आदी कार्ये करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. सन २०२० वर्ष अनेकार्थाने अद्भूत मानले गेले आहे. तब्बल १६५ वर्षांनी सन २०२० या एकाच वर्षात लीप इयर आणि अधिक महिना आला आहे, असे सांगितले जाते. यापूर्वी सन १८६० मध्ये सप्टेंबर महिन्यात अश्विन महिना अधिक आला होता.

Previous Post

काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनाही करोनाची लागण

Next Post

जुनी मिलच्या शेकडो कोटींच्या जागेवर सोलापूर महानगरपालिकेने सोडले पाणी – कुमार करजगी

Related Posts

जयसिंगपूरला १० ऑक्टोबरला स्वाभिमानीची २५ वी ऊस परिषद…ऊसदराचे रणशिंग फुंकणार??
इतर घडामोडी

जयसिंगपूरला १० ऑक्टोबरला स्वाभिमानीची २५ वी ऊस परिषद…ऊसदराचे रणशिंग फुंकणार??

September 16, 2026
राज्यातील डॉक्टरांसाठी ‘KYD’ QR कोड अनिवार्य….
इतर घडामोडी

राज्यातील डॉक्टरांसाठी ‘KYD’ QR कोड अनिवार्य….

September 16, 2026
कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा
इतर घडामोडी

कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

September 15, 2026
दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती
इतर घडामोडी

दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

September 15, 2026
गणेश विसर्जनाच्या तयारीचा महापौर विनायक कोंड्याल यांनी घेतला आढावा
इतर घडामोडी

गणेश विसर्जनाच्या तयारीचा महापौर विनायक कोंड्याल यांनी घेतला आढावा

September 15, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!
इतर घडामोडी

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026
Next Post
जुनी मिलच्या शेकडो कोटींच्या जागेवर सोलापूर महानगरपालिकेने सोडले पाणी –  कुमार करजगी

जुनी मिलच्या शेकडो कोटींच्या जागेवर सोलापूर महानगरपालिकेने सोडले पाणी - कुमार करजगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६”  अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती

जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६” अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती

September 16, 2026
जयसिंगपूरला १० ऑक्टोबरला स्वाभिमानीची २५ वी ऊस परिषद…ऊसदराचे रणशिंग फुंकणार??

जयसिंगपूरला १० ऑक्टोबरला स्वाभिमानीची २५ वी ऊस परिषद…ऊसदराचे रणशिंग फुंकणार??

September 16, 2026
राज्यातील डॉक्टरांसाठी ‘KYD’ QR कोड अनिवार्य….

राज्यातील डॉक्टरांसाठी ‘KYD’ QR कोड अनिवार्य….

September 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026