काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनाही करोनाची लागण

0
481

येस न्युज मराठी नेटवर्क : राज्याचे ऊर्जामंत्री व काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनाही करोनाची लागण झाली आहे. राऊत यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. लोकप्रतिनिधी व मंत्र्यांमध्ये वाढत असलेला करोनाचा संसर्ग ही राज्य सरकारसाठीही चिंतेची बाब बनली आहे.

‘माझा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारी म्हणून स्वत:ची कोविड तपासणी करून घ्यावी,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे. ‘सर्वांनी काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावे,’ असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here