• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

गॅस एजन्सीनी 96 तासात घरपोच गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत – जिल्हाधिकारी

by Yes News Marathi
March 18, 2026
in इतर घडामोडी
0
गॅस एजन्सीनी 96 तासात घरपोच गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत – जिल्हाधिकारी
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :- मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद हा सण 21 मार्च 2026 रोजी साजरा होत आहे. त्यानंतर 23 मार्च 2026 पासून जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीनी गॅस वितरणात एकसूत्रता राखण्याकरता गोदाम, गॅस एजन्सी व इतर ठिकाणाहून गॅस सिलेंडरचे वितरण करू नये. जिल्ह्यात सर्वत्र घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा ऑनलाईन बुकिंग झाल्यानंतर ओटीपी द्वारे 96 तासात घरपोच करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

 सोलापूर जिल्ह्यातील गॅस वितरणा संदर्भातील कार्यवाहीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, एलपीजी गॅस पुरवठा करणारे जिल्हा समन्वयक अधिकारी भुकय्या रघुकुमार यांच्या सह सोलापूर शहर व जिल्ह्यातील गॅस एजन्सी चे प्रतिनिधी उपस्थित होते.

   जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर बाबत 23 मार्च 2026 पासून जिल्ह्यातील एकाही गॅस एजन्सी कडून रांगेत उभा राहून ग्राहकांना गॅस सिलेंडर देऊ नये. ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर ओटीपी द्वारे 96 तासात संबंधित एजन्सीने ग्राहकांना घरपोच गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत. आपल्या गॅस एजन्सी व गोदाम समोर ऑनलाइन बुकिंग, घरपोच सेवेद्वारे गॅस मिळेल एजन्सी मध्ये गॅस मिळणार नसल्याबाबतचे बोर्ड दर्शनी भागात लावावेत. तसेच त्याबाबतचे एसएमएस आपापल्या ग्राहकांना मोबाईलवर पाठवावेत, असेही निर्देश त्यांनी दिले. 

जिल्ह्यात एलपीजी चा पुरवठा मागणीप्रमाणे होत आहे. तरी संबंधित कंपन्यांनी त्याबाबतचा दैनंदिन अहवाल प्रशासनाला सादर करावा. कंपनीच्या स्तरावर गॅस विक्रेत्या साठी ज्या सूचना असतील त्या लेखी स्वरूपात गॅस विक्रेत्यांना द्याव्यात. दुसरे गॅस सिलेंडर वाटप शहरी भागात 25 दिवस तर ग्रामीण भागात 45 दिवस आहे त्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे. गॅस एजन्सीने कोणताही अवैध व्यापार होणार नाही याकरिता आपल्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे. जर कुठेही असे होत असेल तर त्याबाबतची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी. संवेदनशील गॅस एजन्सी ची माहिती पुरवठा विभागाला द्यावी. त्याप्रमाणे त्या एजन्सीला पोलीस संरक्षण देण्याबाबत पोलीस विभागाला कळविण्यात येईल. तसेच पोलीस विभागाने रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर गॅस एजन्सी समोर खरेदी होऊ नये याकरिता शहरी व ग्रामीण भागात पेट्रोलिंग करावे असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

  एलपीजी गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्याचे जिल्हा समन्वयक अधिकारी रघुकुमार यांनी गॅस पुरवठ्याच्या अनुषंगाने एचपीसीएल, बीपीसीएल व आयओसीएल यांच्याकडून एजन्सीसाठी आलेल्या

सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यात मागणीप्रमाणे एलपीजी गॅस पुरवठा मिळत असल्याचे सांगून 23 मार्च 2026 पासून ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर ओटीपी द्वारे 96 तासात गॅस सिलेंडर एजन्सी उपलब्ध करून देतील, असे त्यांनी सांगितले.

  प्रारंभी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी ग्रामीण भागातील गॅस पुरवठ्याच्या अनुषंगाने माहिती दिली तर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी सोलापूर शहरात एलपीजी गॅस पुरवठ्याच्या अनुषंगाने माहिती दिली. 
Previous Post

सोलापूर झेडपीचा अध्यक्ष -उपाध्यक्ष सव्वा वर्षासाठीच अध्यक्षपदासाठी वैद्य तर उपाध्यक्ष पदासाठी इंदाभाऊ

Next Post

सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा झाला झेडपी अध्यक्ष तर इंदाभाऊला निष्ठेचे फळ

Next Post
सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा झाला झेडपी अध्यक्ष तर इंदाभाऊला निष्ठेचे फळ

सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा झाला झेडपी अध्यक्ष तर इंदाभाऊला निष्ठेचे फळ

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In