येस न्युज मराठी नेटवर्क । साऊथम्प्टनमध्ये पाऊस पडत असल्यामुळे चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होऊ शकलेली नाही. साऊदप्टनमध्ये पावसाच्या हलक्या सरी असल्यातरी सामना खेळण्यायोग्य परिस्थिती नाही. हवामानाचा अंदाज घेतल्यानंतर सामना उशिराने सुरु होणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यावर न्यूझीलंडने मजबूत पकड मिळवली आहे. सामन्याचा तिसरा दिवस पूर्णपणे किवी खेळाडूंनी गाजवला होता. आधी गोलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताचा संघ 217 धावांत गारद केला. त्यानंतर फलंदाजांनी भारताचा गोलंदाजांना जेरीस आणलं. तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने 2 बाद 101 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडे सध्या 116 धावांची आघाडी शिल्लक आहे. परंतु भारताला 49 षटकांमध्ये केवळ दोनच बळी मिळवता आल्याने सामन्यात सध्यातरी न्यूझीलंड सरस आहे.








