सोलापूर शहरात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून होणाऱ्या दोन उड्डाणपूलांचा विषय गेल्या दहा वर्षापासून गाजत आहे. मात्र आता याला जोरदार गती आली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या प्रकल्पाला निगडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून मंजुरी देण्यात आली. त्यामुळे एसटी,पीडब्ल्यूडी, एन जी मिल, एम एस ई बी, पोलीस, तसेच मेडिकल कॉलेज या विभागाच्या उड्डाणपुलासाठी लागणाऱ्या जागा कोणताही मोबदला न देता एन एचएआय कडे वर्ग होणार आहेत. आता रेल्वे, बीएसएनएल आणि टपाल विभागाची जागा येत्या दहा ते पंधरा दिवसात ताब्यात घेतल्या जाणार आहेत. जुना पुना नाका ते सात रस्ता, आणि जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे दोन उड्डाणपूल एन एच ए आय कडून मंजूर असून त्याला एक हजार वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. विशेष म्हणजे एनएचएआय कडून याचे टेंडर काढले असून येत्या दीड महिन्याच्या आत काम सुरू करण्यासंदर्भात ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली जाणार असल्याची माहिती एनएचएआयकडून देण्यात आली. त्यामुळे बऱ्याच वर्षांचे सोलापूर शहरातील उड्डाणपूलांचे स्वप्न पूर्ण होईल हे नक्की.











