सोलापूरच्या महिला व बालविकास अधिकारी पदी मा. श्री रमेश काटकर यांची नेमणूक

0
31

आज युवा ग्राम विकास मंडळ अंतर्गत चालत असलेल्या मुलांचा न्याय प्रवेश सुनिश्चित करणे प्रकल्प अंतर्गत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोलापूर मा. श्री रमेश काटकर यांचे स्वागत करण्यात आले. मा काटकर सर हे सोलापूर जिल्ह्यात महिला व बालविकास अधिकारी म्हणून रूजू झाले यावेळी बालकल्याण समिती अध्यक्ष समीर सय्यद व बालकल्याण समिती सदस्य ॲड.सुवर्णा कोकरे, सारिका तमशेट्टी विपला फाउंडेशन उपस्थित होत्या. युवा ग्राम संस्था सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मुलांचा न्याय प्रवेश सुनिश्चीत करणे हा प्रकल्प एकूण १५० गावात चालवीत आहे, यामध्ये बालविवाह प्रतिबंध, बाल लैंगिक अत्याचार व बाल मानवी वाहतूक आणि बाल मजुरी, या विषयावर काम करीत आहे .

या मध्ये आपण जास्तीत जास्त बालविवाह रोखवणे तसेच 2,25000 बालविवाह करणार नाही या साठी प्रतिज्ञा पत्र भरून घेणार आहोत त्याच बरोबर पोक्सो केस मध्ये जास्तीत जास्त काम करून पिडीते ची माहीती गोपनीय ठेऊन न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा प्रकल्प कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन च्या सहकार्याने युवा ग्राम विकास मंडळ सोलापूर व उस्मानाबाद मधील तीनशे गावांमध्ये राबवित आहे. यावेळी मुलांचा न्यायप्रवेश निश्चित करणे कार्यक्रम समन्वयक रजनीगंधा गायकवाड व प्रदीप नागटिळक हे जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहत आहेत यावेळी जिल्हा प्रकल्प समन्वयक रजनीगंधा गायकवाड यांनी महिला व बालविकास अधिकारी काटकर साहेबांचा सत्कार केला.