सोलापूर-दरवर्षी प्रमाणे या वर्षीही स्वरनाद संगीत विद्यालय आणि स्व.हार्दिक पटेल फौंडेशन यांच्यावतीने यंदा ४ सिझन एकल गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.सोलापुरातील ही अतिशय गाजलेली स्पर्धा असून आपल्या सोलापुरातील गायकांना व्यासपीठ मिळावे म्हणून ही स्पर्धा आपण दरवर्षी घेत असतो. ही स्पर्धा अतिशय नेटक्या पद्धतीने सलग ३ वर्षे सुरु आहे. प्राथमिक फेरी ही ऑनलाईन पद्धतीने होते ज्यामध्ये विद्यार्थ्यांना २ ते ३ मिनिटांचा video दिलेल्या मोबाईल नंबर वर पाठवायचा आहे. त्यानंतर त्याच्यातून सेमीफायनल मध्ये ज्यांचे selection झाले आहे त्यांचा सेकंड राऊड घेण्यात येतो. तसेच त्यातून निवडलेले फायनल मध्ये सहभाग होतात. फायनल स्पर्धा ही लाइव्ह बॅन्ड बरोबर घेतली जाते. या स्पर्धेसाठी मीडिया पार्टनर बी. आर.न्युज यांचे सहकार्य लाभत आहे.. ही स्पर्धा आपण २ ग्रुप मध्ये घेतो..
लहान गट (५ ते १५ वर्षे)
मोठा गट (१६ ते पुढे ओपन)
या स्पर्धेसाठी लहान गटाला प्रथम पारितोषिक रु ५००० द्वितीय ३००० तृतीय २००० उतेजनार्थ २ प्रत्येकी १००० रु.. रोख.. सर्टिफिकेट आणि ट्रॉफी तसेच मोठ्या गटाला ७०००,५०००/३०००: आणि उतेजनार्थ २ प्रत्येकी certificate, ट्रॉफी.. बक्षिसांचे स्वरूप असेल.. विद्यार्थ्यांना आपला गाण्याचा व्हिडिओ ९८५००८९९८० नंबर वर पाठवायचा आहे.अधिक माहितीसाठी ९६६५४६१२९३, ७०२०४१४७६४ या क्रमांकावर संपर्क साधावा . या पत्रकार परिषदेला हरेशभाई पटेल, हेमाबेन पटेल, नागेश पवार, श्रीरंग बनसोडे, याचना पटेल, दीपाली शहा उपस्थित होते










