सोलापूर : इस्कॉन सोलापूर आणि बडा बिझनेस च्या सहकार्याने ‘बिझनेस योगा वुईथ भगवत गीता’ या विषयावर येत्या रविवारी 20 जून रोजी दुपारी १२ वाजता जगातील सर्वात मोठ्या वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे. इस्कॉन चे संस्थापक स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . हा वेबिनार पूर्णपणे विनामूल्य असून डॉक्टर विवेक बिंद्रा यांच्याद्वारे हा वेबिनार घेण्यात येणार आहे. वेबिनार साठी 90494955 26 आणि 9923497110 या क्रमांकावर रजिस्ट्रेशन करता येईल. तसेच https:/kiye.co.in/?sp210 या लिंकवरून सोलापूर जिल्ह्यातील युवकांना नोंदणी करता येईल. ‘ वेबीनारमधील सर्वाधिक सहभागी प्रेक्षक ‘ असा एक नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा इस्कॉनचा मानस असल्याचे सांगण्यात आले.