मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मात्र या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. याच कारणामुळे यावेळी महिलांना मार्च आणि एप्रिल अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार का? असा सवाल केला जातोय. याच मुद्द्यावरून लाखो महिलांत संभ्रम निर्माण झाला आहे. यावरच आता महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्वत: समोर येऊन सगळा संभ्रम दूर केला आहे.
काय म्हणाल्या मंत्री आदिती तटकरे
फेब्रुवारी महिन्याचे पैसे हे 7 मार्च रोजी मिळतील. तर मार्च महिन्याचे पैसे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मिळतील अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे मोठी घोषणा करत म्हणाल्या…










