.. अखेर वॉन्लेस हॉस्पिटल ला मिळाली नवसंजीवनी; तामिळनाडू च्या वेल्लोर स्थित ख्रिश्चन मेडिकल कॉलेजकडे होणार हस्तांतरण

0
24

सांगली; वैद्यकीय क्षेत्रामधील १३० वर्षाची दीर्घ परंपरा असलेले मिरज शहराच्या वैभवात भर घालणारे आणि मिरजेचा वैद्यकीय पंढरी असा नावलौकिक निर्माण करण्यात सिहाचा वाटा असलेले वॉन्लेस हॉस्पिटल आता तामिळनाडू च्या वेल्लोर स्थित ख्रिश्चन मेडिकल कॉलेज च्या पथकाने नुकतीच पहाणी केली त्यामुळे लवकरच या रुग्णालयाला नवसंजीवनी मिळणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून या रुग्णालयाची आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे रुग्णालयातील शेकडो कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागले होते तसेचमोठया थकबाकी मुळे वीज पुरवठा खंडित होण्याची नामुष्की रुग्णालय प्रशासनावर ओढवली होती या सर्व पार्श्वभूमीवर रुग्णालय आणि वेल्लोर स्थित ख्रिश्चन मेडिकल कॉलेज यांच्यात हे रुग्णालय चालवण्या संदर्भात चाचपणी सुरु होती यापूर्वी तशी बैठकही दोहों मध्ये झाली होती आज प्रत्यक्ष कॉलेज च्या पथकाने रुग्णालयाची पहाणी केली असून लवकरच हे पथक संचालक मंडळाला आपला अहवाल सादर करेल त्यामुळे भविष्यात रुग्णालय सुरु होण्याबाबत कर्मचारी आणि नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अमेरिकन मिशनरी डॉ सर विल्यम वॉन्लेस यांनी १८९४ मध्ये या रुग्णालयाची स्थापना करून मिरज मध्ये आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीचा पाया रचला डॉ वॉन्लेस यांनी हजारो गोर गरीब रुग्णांना आपल्या उपचारांनी बरे केले छत्रपती शाहू महाराज आणि नटश्रेष्ठ बालगंधर्व यांच्यावरही त्यांनी यशस्वी उपचार केल्याची नोंद आहे.

पुढे १९६२ मध्ये या रुग्णालयाच्या सहकार्याने मिरज मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले. या रुग्णालयात पश्चिम महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील बहुसंख्य रुग्ण उपचाराला येऊ लागल्याने साहजिकच मिरजेचा नावलौकिक वाढू लागला. मात्र गेल्या काही वर्षांपासून या रुग्णालयाला आर्थिक अडचणींना मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागले. शेकडो कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत असल्याने कित्तेक कुटुंबाना उपासमारीची वेळ आली आहे यासाठी विविध संघटनांनी आंदोलनेही केली यामध्ये काही महिन्यापूर्वी एका कर्मचाऱ्याचा मृत्यूही झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आता वेल्लोर स्थित मेडिकल कॉलेज च्या अधिपत्याखाली हे रुग्णालय सुरू होण्याबाबत निर्णय होईल आणि नव्याने रुग्णाच्या सेवेमध्ये हे वैभवशाली परंपरा असलेले रुग्णालय दाखल होईल.