सोलापूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी आज सर्वत्र शांततेत मतदान पार पडले.एकूण 917 उमेदवार रिंगणात असून 152 प्रभागांसाठी 499 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले.
नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले भाजपाचे 12, शिंदेसेनेचे सहा, अजित पवार गटाचे दोन, उद्धवसेनेचे चार, काँग्रेसचे पाच तर शरद पवार गटाचे तीन उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंदिस्त झाले आहे.

