• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

Yes News Marathi by Yes News Marathi
October 16, 2026
in Blog
0
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
0
SHARES
1
VIEWS

फेब्रुवारी-मार्च २०२७ मधील दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी सवलत; राज्य मंडळाच्या पुढील सूचना निर्गमित होणार

सोलापूर जिल्ह्यात दहावीचे ७२ हजार १७०, तर बारावीचे ४९ हजार ६६२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार

सोलापूर : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांकडून पुढील आदेश होईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता ऑनलाइन आवेदनपत्रे भरून घेण्याची कार्यवाही करण्यात येणार असून, याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सविस्तर सूचना निर्गमित होणार आहेत, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.

मदत व पुनर्वसन विभागाच्या २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने विशेष उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचाही समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षांसाठी ऑनलाइन आवेदनपत्रे भरण्याची प्रक्रिया सुरू असून, दुष्काळग्रस्त भागातील पात्र विद्यार्थ्यांना शुल्क माफीचा लाभ मिळावा, यासाठी पुढील आदेश होईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता आवेदनपत्रे भरून घेण्यात येणार आहेत. यासंदर्भात राज्य मंडळाकडून पुढील सविस्तर सूचना निर्गमित करण्यात येतील. परीक्षा शुल्काअभावी कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केले आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण व शहर विभाग मिळून फेब्रुवारी-मार्च २०२७ च्या परीक्षेसाठी दहावीचे एकूण ७२ हजार १७० विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. यामध्ये ३८ हजार ७१७ मुले व ३३ हजार ४५३ मुलींचा समावेश आहे. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण ४९ हजार ६६२ विद्यार्थी प्रविष्ट होणार असून, त्यामध्ये २५ हजार ९५१ मुले व २३ हजार ७११ मुली आहेत.

ग्रामीण भागातील तालुकानिहाय विद्यार्थी संख्या : सोलापूर ग्रामीण भागातील ११ तालुक्यांमध्ये दहावीच्या परीक्षेसाठी पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक ७ हजार ९५२ विद्यार्थी, माळशिरस ७ हजार ३५९, बार्शी ६ हजार ७५, सांगोला ५ हजार ७२८, माढा ५ हजार ५९७, उत्तर सोलापूर ५ हजार १५२, अक्कलकोट ४ हजार ७२२, मोहोळ ४ हजार ६०२, दक्षिण सोलापूर ४ हजार ३४३, मंगळवेढा ३ हजार ८२४ आणि करमाळा तालुक्यात ३ हजार ३५५ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत. ग्रामीण भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ५८ हजार ७०९ आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी ग्रामीण भागात पंढरपूर तालुक्यात ६ हजार १५७, माळशिरस ४ हजार ९८२, बार्शी ४ हजार ७९१, सांगोला ४ हजार १५२, माढा ३ हजार ९१८, उत्तर सोलापूर २ हजार ७८८, मोहोळ २ हजार ७६४, मंगळवेढा २ हजार ५५३, दक्षिण सोलापूर २ हजार ५०८, अक्कलकोट २ हजार ४२३ आणि करमाळा तालुक्यात २ हजार ६१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत. ग्रामीण भागातील बारावीच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३९ हजार ९७ आहे.

सोलापूर शहर विभागातील विद्यार्थी संख्या : शहरातील यूआरसी-१ अंतर्गत दहावीचे ७ हजार ५८२ व बारावीचे ५ हजार ५८६ विद्यार्थी, तर यूआरसी-२ अंतर्गत दहावीचे ५ हजार ८७९ व बारावीचे ४ हजार ९७९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत.

Previous Post

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Next Post

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

Related Posts

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश
Blog

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
Blog

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी
Blog

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!
Blog

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !
Blog

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026
श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६
Blog

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

October 13, 2026
Next Post
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

October 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026