सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश अण्णा महानवर यांची आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपस्थित सहकाऱ्यांसमवेत त्यांचा सत्कार करून शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी त्यांच्याशी विद्यापीठातील शैक्षणिक उपक्रम, संशोधनवृद्धी, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या नव्या योजना तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली.


यावेळी सोलापूर जिल्ह्यातील आणि अक्कलकोट तालुक्यातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाने घेतलेला पुढाकार उल्लेखनीय असल्याची भावना व्यक्त केली. तसेच, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी यावेळी दर्शवली. यावेळी भाजपा नेते शहाजी पवार यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते.

