• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वीरशैव व्हिजनतर्फे शुक्रवार पासून बसव व्याख्यानमालाचे आयोजन..

Yes News Marathi by Yes News Marathi
April 21, 2025
in इतर घडामोडी
0
वीरशैव व्हिजनतर्फे शुक्रवार पासून बसव व्याख्यानमालाचे आयोजन..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूरः जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव व्हिजनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही 25 ते 27 एप्रिल दरम्यान रोज सायंकाळी ६ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात बसव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यंदाचे व्याख्यानमालेचे 11 वे वर्ष असून या तीनदिवसीय बसव व्याख्यानमालेतील पहिले पुष्प शुक्रवार, 25 एप्रिल रोजी डॉ. गिरीश जाखोटीया (मुंबई) हे ‘महात्मा बसवेश्वर व 21 वे शतक’ या विषयावर गुंफणार आहेत. या पहिल्या पुष्पाचे उद्घाटन आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, सोलापूर नागरी बँक असोसिएशनचे चेअरमन प्रकाश वाले, महावीर बँकेचे चेअरमन दीपक मुनोत, कांचन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदीप चाकोते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

दुसरे पुष्प शनिवार, दि. 26 एप्रिल रोजी इंद्रनील बंकापुरे कोल्हापूर हे ‘मंदिराच्या देशा’ या विषयावर गुंफणार आहेत. दुसऱ्या पुष्पाचे उदघाट्न आ. प्रवीण स्वामी (उमरगा) यांच्या हस्ते व मनपाचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी उद्योगपती दत्ता सुरवसे, श्री सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, उद्योजक पंडित जळकोटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

रविवार, दि. 27 रोजी नारायण पुरी यांच्या ‘हास्यधारा’ या विनोदी कार्यक्रमाने या व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. समारोपाच्या पुष्पाचे उद्घाटन आ. देवेंद्र कोठे यांच्या हस्ते आणि माजी विरोधी पक्षनेता अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी निवृत्त सहायक पोलीस आयुक्त दीपक आर्वे, सागर सिमेंटचे व्यवस्थापक महादेव कोगनुरे, श्री सिद्धेश्वर बँकेचे संचालक सिद्धेश्वर मुनाळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

दरम्यान या व्याख्यानमालेस उपस्थित राहणाऱ्या श्रोत्यांमधून दररोज ५ श्रोत्यांना सोडतीद्वारे आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तरी सोलापूरवासियांनी या बसव व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस नागेश बडदाळ, आनंद दुलंगे, विजयकुमार बिराजदार, सोमेश्वर याबाजी, राजेश नीला, अविनाश हत्तरकी, सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते.

Previous Post

साहेब तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेऊन जीवन संपवले… लाडक्या बहिणीचे एकनाथ शिंदेंना पत्र…

Next Post

सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी 43 अंश अशा तापमानाची नोंद…

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी 43 अंश अशा तापमानाची नोंद…

सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी 43 अंश अशा तापमानाची नोंद...

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026