सोलापूर : जिल्हा परिषद व डोणगाव आरोग्य उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सीईओ दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधनानिमित्त महिलांसाठी लसीकरण मोहीम राबवण्यात आली. डोणगाव येथील वनिता संतोष मेटे या महिलेच्या शुभहस्ते सरस्वती पूजन करून लसीकरण कॅम्पला सुरुवात करण्यात आली. यामध्ये जवळपास 50 महिलांना लस देण्यात . यशस्वीतेसाठी डॉक्टर सुनयना सलगर ,सुपरवायझर काशिनाथ जाधव , आशा गटप्रवर्तक सुनीता कट्टे , कविता राठोड, आरोग्य सेवक डॉ. अलकुंटे, आशा वर्कर महानंदा माने, आशा नदाफ, माधुरी पाटील, जया माने यांनी परिश्रम घेतले.