सोलापूर : मराठा आरक्षणाचे जनक, मराठा क्रांतीसूर्य व माथाडींचे आराध्यदैवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांचा सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पूर्णकृती पुतळा उभारण्यासाठी सर्वानुमते निर्णय झाल्यामुळे आज कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयामध्ये माजी आमदार तथा अध्यक्ष अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनचे नरेंद्र पाटील यांनी महापौर श्रीकांचना यन्नम व सभागृह नेते शिवानंद पाटील यांचे आभार मानले. यावेळी विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे,गटनेते चेतन नरोटे आदी मान्यवर उपस्थित होते.