
मशालीच्या उजेडात इंजिन धावणार; घड्याळ घालून तुतारी वाजवणार
भाजपाचा विजयी अश्व रोखण्यासाठी मुंबईमध्ये उबाठा आणि मनसे एकत्र येण्यावर आज शिक्कामोर्तब झाले असून उद्या दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद घेऊन याची अधिकृत घोषणा करण्यात येईल अशी माहिती संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तर पुण्यात देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे. याची अधिकृत घोषणा 26 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. हे एकत्र येणे न रुचल्याने शरद पवारांचे विश्वासू प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनामाचे मला काही माहिती नाही असे सांगत सुप्रिया सुळे यांनी कानावर हात ठेवले.पुण्यातील या काका – पुतण्याच्या मनोमिलनावर संजय राऊत यांनी आक्षेप नोंदवत त्यांच्यासोबत पुण्यात युती करणार नसल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या विरोधात लढण्याचा ठाम निश्चय बोलून दाखवला.

