• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

घरफोडी करणारे आंतरराज्यीय दोन सराईत चोरटे जेरबंद.

Yes News Marathi by Yes News Marathi
November 28, 2025
in इतर घडामोडी
0
घरफोडी करणारे आंतरराज्यीय दोन सराईत चोरटे जेरबंद.
0
SHARES
2
VIEWS

13.3 तोळे सोन्याचे दागिने, व 1 किलो 804 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकुण 20,00,180/- रु.किंमतीचा मुददेमाल हस्तगत.
सोलापूर शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी.

 फिर्यादी सतिश शिवप्पा सोलापूरे वय-62 वर्षे, व्यवसाय :- सेवानिवृत्त, रा. घर नं. 38, कित्तूर चिन्नम्मा नगर, विजापूर रोड सोलापूर हे दि.21/11/2025 रोजी तळमजल्याच्या घरास कुलूप लावून, वरच्या मजल्यावर जावुन झोपले होते. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे तळमजल्याच्या बंद घराचे कडी-कोयंडा व कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सुमारे 4,87,800/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले बाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन विजापूर नाका पो.स्टे सोलापूर शहर येथे गुन्हा रजि नं. 577/2025 भा.न्या.सं.2023 कलम 331(4), 305 (ए) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

तसेच त्याच दिवशी रात्री तक्रारदार नामे एल.श्रवणकुमार लगुन वय-39 वर्षे, व्यवसाय :- नोकरी, रा. सध्या रा. बी-71, पाटील नगर, सैफुल, विजापूर रोड, सोलापूर याचे देखील बंद घराचे अज्ञात चोरटयाने कडी, कोयंडा व कुलूप तोडून, घरातील कपाटात ठेवलेले सुमारे 19,33,000/- रु. किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले.

तसेच सदर परिसरात राहणा-या पुजा सचिन जाधव यांचे घरात देखील चोरी करण्याचा प्रयत्न झालेला होता. विजापूर नाका पोलीस ठाणे हददीत एकाच रात्रीत 03 ठिकाणी अज्ञात चोरटयांनी घरफोडी-चोरी केल्याने, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी नमुद गुन्हे लागलीच उघडकीस आणणेबाबत गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदेशीत केले होते.

वरील घडलेल्या घरफोडीच्या घटनांचे गांर्भिय ओळखुन, अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळास भेट दिली. घटनास्थळाचे परिसरातील प्राप्त सी.सी.टी.व्ही फुटेज व संकलित केलेल्या इतर तांत्रीक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केल्याची पथकाने खात्री केली. त्यादरम्यान सदरचा गुन्हा करणारे दोन इसमांबाबत सपोनि  शैलेश खेडकर यांचे पथकातील पोलीस अंमलदार- इम्रान जमादार यांना गोपनीय बातमी मिळाली की, चोरी करणारे सराईत गुन्हेगार नामे- (1) राघवेंद्र उर्फ रघू उर्फ नागराज शंभू नाईक, वय- 32 वर्षे, मुळ रा. येडगुंजी मंदिर जवळ, मण्णेगीगांव ता. होन्नावार जि. कारवार राज्य कर्नाटक व त्याचा साथीदार नामे (2) लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक, वय-28 वर्षे, मुळ रा. सदाशिव नगर, बेळगांव राज्य कर्नाटक सध्या रा. वसूर, बेळगांव राज्य कर्नाटक  हे त्यांनी चोरी केलेले सोने व चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी ते समर्थ सोसायटी ए.जी.पाटील कॉलेज परिसरात रात्रीच्या वेळी येणार आहेत. त्याअनुषंगाने पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला असता, बातमीतील वर्णनाचे सराईत गुन्हेगार हे त्याठिकाणी आल्याचे दिसताच त्यांना ताब्यात घेतले व त्यांचे झडतीमध्ये वर नमूद गुन्ह्यातील  सोने व चांदीचे दागिने मिळून आले असता सदर मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सदर मुददेमालाबाबत विचारणा केली असता, त्यांनी सदरचा मुददेमाल हा " सैफुल येथील तीन घरे फोडून चोरी केला असल्याचे कबूल केले. तसेच सदरचा मुददेमाल हा त्यांनी विजापूर येथे विकण्याचा प्रयत्न केला परंतू तेथे मुददेमाल पावत्या नसल्याने, तो मुददेमाल कोणी विकत घेत नसल्याने, आम्ही सोलापूर येथे अनोळखी गि-हाईक पाहून सदरचा मुददेमाल विक्री करणार असल्याचे सांगितले. त्यावरून नमूद दोन्ही आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. 

अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील स.पो.नि.शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने नमूद गुन्ह्यातील 13.3 तोळे सोन्याचे दागिने व 1 किलो 804 ग्रॅम û चांदीचे दागिने व वस्तू असा एकुण 20,00,180/- रु. किंमतीचा मुददेमाल हस्तगत करुन, विजापूर नाका पो.स्टे हददीत घडलेला गंभीर स्वरुपाचा घरफोडीचा गुन्हा अत्यंत कमी वेळात, कौशल्याने व अविरत परीश्रमाने उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी एम.राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापुर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे, राजन माने, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे तसेच अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे स.पो.नि. शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, महेश रोकडे, इब्राहिम शेख, चालक बाळासाहेब काळे, घोरपडे तसेच सायबर पो.स्टे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड, रतिकांत राजमाने यांनी केली आहे.

Previous Post

मतदान व मतमोजणी कालावधीत मद्य विक्री दुकाने बंद

Next Post

पंडीत भिमण्णा जाधव ,मास्टर व्येंकटेशकुमार पिता पुत्राना आकाशवाणी सगीत संमेलनात सुंद्रीवादन करिता निमंत्रण…

Related Posts

एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!
इतर घडामोडी

एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!

September 1, 2026
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!
इतर घडामोडी

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!

September 1, 2026
फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.
इतर घडामोडी

फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.

September 1, 2026
बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
इतर घडामोडी

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती
इतर घडामोडी

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026
SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

August 31, 2026
Next Post
पंडीत भिमण्णा जाधव ,मास्टर व्येंकटेशकुमार पिता पुत्राना आकाशवाणी सगीत संमेलनात सुंद्रीवादन करिता निमंत्रण…

पंडीत भिमण्णा जाधव ,मास्टर व्येंकटेशकुमार पिता पुत्राना आकाशवाणी सगीत संमेलनात सुंद्रीवादन करिता निमंत्रण…

ताज्या बातम्या

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026