ऊसतोड व शेत मंजुर महिलांना वाण म्हणून दिले ताट, ग्लास व तीळाचे लाडू

0
135

मकरसंक्रांती निमित्त श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने जोपासली बांधिलकी

Best Software Company In Solapur

सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान व श्रीमंतयोगी महिला ग्रुपच्या वतीने संक्रांत निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी म्हणून ऊसतोड महिला कामगार व शेत मंजुर महिलांना वाण म्हणून जेवणाचे ताट, ग्लास व तिळाचे लाडूसह विविध प्रकारचे खाद्यपदार्थ देण्यात आले.

     ऊसतोड व शेत मजूर महिला कामगार हे अनेक वर्षापासून मंजूरी करतात. कामावर असताना त्यांना व सोबतच्या लहान मुलाना युज अँड थ्रू अशा कागदी वा प्लास्टिक ताटात जेवण करावे लागते. यातून अस्वच्छतेमुळे अपाय होऊ शकतो. हे टाळण्यासाठी वाण म्हणून त्यांना जेवणाचे ताट, ग्लास व तिळाचे लाडूसह विविध प्रकारचे खाद्यपदार्थ देण्यात आले.

    मंगळवेढा रोड बसवेश्वर नगर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक महेश कासट आणि अक्षता कासट, नर्मदा कनकी, रुपा कुत्ताते, शिला तापडीया, शुभांगी लचके, माधुरी चव्हाण, अर्चना बंडगर, वर्षा भावार्थी, रेखा गायकवाड, वैशाली आडकी यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

    हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे शुभम कासट, सुरेश लकडे, मल्लिकार्जुन यणपे, रोहित पांढरे, संतोष अंलकुटे आदींसह कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

आहाराच्या दृष्टीने महत्व : संस्थापक कासट
मकरसंक्रांत हा एक शेती संबंधित सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात.हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ हे हिवाळ्यात आहाराच्या दृष्टीने महत्व आहे. त्यामुळे हे वाण दिलं जातं. त्यांच उद्देशाने श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. असे प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट यांनी सांगितले.