सोलापूर : उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर जिल्ह्यातील २३ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश या विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांनी दिले. जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यरत असणाऱ्या १४ सहायक दुय्यम निरीक्षकांच्या तसेच ९ जवानांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये काहीजणांना पदोन्नती मिळाली आहे.