मान्सून पूर्व कामे करण्यासाठी मे महिना हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ड्रेनेजची मॅन हॉल स्वच्छ करणे…नाले खोलीकरण तसेच स्वच्छता मोहीम राबवणे…शहरातील रस्ते करणे तसेच खड्डे बुजवणे… धोकादायक इमारतींना नोटीसा देऊन त्या पाडणे… या महत्त्वाच्या बाबीकडे सोलापूर महापालिकेकडून फारसे काम होताना दिसत नाही. उलट सोलापूर शहरातील जे रस्ते चांगले आहेत ते केबल टाकण्याच्या नावाखाली उखडण्याचे काम सुरू आहे. स्वच्छता मोहिमेकडे देखील फारसे लक्ष दिले जात नाही. स्मार्ट सिटी योजनेतून शहरात दहा किलोमीटर रस्ते करण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या रस्त्यावर देखील अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत मात्र त्याच्या मेंटेनन्स कडे महापालिका लक्ष देत नाही. झोन अधिकारी कधी बजेट नाही तर कधी प्रिमिक्स नाही असं कारण देतात. आता युद्धामुळे डांबराची भाव वाढले आहेत तसेच महापालिका आमची साठ कोटी रुपयांची बिले देत नाही.. अशी कारणे सांगून आता कामाला विलंब लावला जात आहे. त्यामुळे या महिन्यात ही महत्त्वाची कामे न झाल्यास पावसाळ्यात शहरवासीयांना मोठा सामना करावा लागणार आहे.

